खडकवासल्यात भाजपने मारला विजयी चौकार; भीमराव तापकीर पुन्हा विजयी

खडकवासला मतदारसंघात २००९ पूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि त्या पाठोपाठ शिवसेनेची सत्ता होती. हा मतदारसंघ गेल्या तीन टर्मपासून भाजपकडे आहे. पुणे जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व दिसून येत आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

खडकवासल्यात भाजपने मारला विजयी चौकार; भीमराव तापकीर पुन्हा विजयी

दोडकेंच्या नशिबी पुन्हा पराभव

खडकवासला मतदारसंघात २००९ पूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि त्या पाठोपाठ शिवसेनेची सत्ता होती. हा मतदारसंघ गेल्या तीन टर्मपासून भाजपकडे आहे. पुणे जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व दिसून येत आहे. जिल्ह्यातील अनेक मतदारसंघ आपल्याच बाजूने राखण्यात त्यांना मोठे यश आले आहे, तर पुणे जिल्ह्यातील खडकवासला मतदारसंघात भाजपच्या भीमराव तापकीर यांनी विजय प्राप्त केला आहे.

पुणे शहरातील खडकवासला मतदारसंघ यंदाच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान सातत्याने चर्चेत राहिला आहे. या मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर, शरद पवार गटाचे उमेदवार सचिन दोडके आणि मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे चिरंजीव मयूरेश वांजळे यांच्यातील तिहेरी लढतीची राज्यभरात चर्चा सुरू होती. विशेष म्हणजे २० नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर शरद पवार गटाचे उमेदवार सचिन दोडके यांचे खडकवासला विधानसभा आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक स्वागत, असे फ्लेक्स लावण्यात आलेले होते. मतदारसंघात कार्यकर्त्यांनी सचिन दोडके यांना खांद्यावर बसवून विजयी मिरवणूक काढली होती.  खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, गेल्या तीन निवडणुकांपासून भाजपने आपले वर्चस्व दाखवत विजय मिळवला आहे. भाजपने आता विजयाचा चौकार मारला आहे.  भाजपकडून विद्यमान आमदार भीमराप तापकीर, मनसेकडून दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे सुपुत्र मयूरेश वांजळे आणि शरद पवार गटाचे सचिन दोडके आमने-सामने आहेत. भीमराव तापकीर सलग तीन वेळा निवडणुकीमध्ये जिंकून आले आहेत. तर सचिन दोडके मागील निवडणुकीमध्ये २५९५ मतांनी पराभव झाला होता, तर मयूरेश वांजळे यांची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. या तिरंगी लढतीमध्ये कोणता उमेदवार बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचे होते.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारंभीच खडकवासल्यात घडामोडींना वेग आला होता. भाजपच्या गोटात तर प्रचंड असंतोष असल्याची चर्चा होती. कारण काही मतदारसंघांमध्ये भाजपमधील अनेक नेते मंडळी इच्छुक होती. त्यात खडकवासल्याचा समावेश होता. यावरून पक्षांतर्गत गटबाजी आणि मतभेद समोर आले होते. आमदार भीमराव तापकीर, नगरसेवक प्रसन्न जगताप आणि नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांच्यात खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे पक्ष निरीक्षक धनंजय महाडिक यांच्यासमोरच भाजप नेत्यांमध्ये मोठा वाद झाला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी  पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपापसात कोणताही वाद, मतभेद न ठेवण्याचे आवाहन केले होते. भाजप आमदार भीमराव तापकीर यांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजी असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. तरीही तापकीर यांनी बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे.

खडकवासला विधानसभा मतदारसंघातून २० फेऱ्यानंतर भीमराव तापकीर यांना तब्बल ४१,२६४ मतांनी आघाडीवर आहेत. मात्र सर्व फेऱ्यांअखेरीस भीमराव तापकीर यांना १,६३,१३१ मते तर सचिन दोडके यांना १,१०,८०९ मते मिळाली आहेत. गेल्या तीन निवडणुकांपासून भाजपने आपले वर्चस्व दाखवत विजय मिळवला आहे. भाजपने आता विजयाचा चौकार मारला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest