पुणे : नवले पुलावरील अपघाताची मालिका सुरूच, कोळसा वाहून नेणारा कंटेवर पलटी

नवले पुलाजवळील भूमकर पुलावर दगडी कोळसा वाहून नेणारा कंटेनर पलटी झाला आहे. हा अपघात सकाळी (सोमवारी) साडेदहाच्या सुमारास घडला आहे. सुदैवात यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, चालक जखमी झाला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 10 Jul 2023
  • 11:33 am
Pune accident :  नवले पुलावरील अपघाताची मालिका सुरूच, कोळसा वाहून नेणारा कंटेवर पलटी

कोळसा वाहून नेणारा कंटेवर पलटी

रस्त्यावर कोळसा सांडल्याने वाहतूक कोंडी, चालक जखमी

मुंबई-बंगळुरू महामार्गावर पुण्यातील नऱ्हे परिसरात असलेल्या नवले पुलावरील अपघाताची मालिका काही केल्या थांबायचे नाव घेत नाही. नवले पुलाजवळील भूमकर पुलावर दगडी कोळसा वाहून नेणारा कंटेनर पलटी झाला आहे. हा अपघात सकाळी (सोमवारी) साडेदहाच्या सुमारास घडला आहे. सुदैवात यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, चालक जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेदहाच्या सुमारास कोळसा वाहून नेणारा कंटेनर साताऱ्यावरून मुंबईच्या दिशेने जात होता. मुंबई-बंगळुरू महामार्गावरील भुमकर पुलाजवळ येताच कंटेनर लोखंडी दुभाजकाला धडकला. त्यामुळे कंटेनर दुभाजक तोडून विरुद्ध दिशेला जाऊन उलटला आहे. यामध्ये चालक जखमी झाला आहे. त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कंटेनर पलटी झाल्यामुळे कोळसा महामार्गावर पसरला आहे. त्यामुळे, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून वाहतूक सुरळित करणाचे काम सुरू आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest