पुणेकरांसाठी ‘गुड न्यूज’; पुण्याहून बँकॉक, दुबईला आता थेट विमानसेवा

पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी दोन नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे येत्या २७ ऑक्टोबर, २०२४ पासून सुरु होत असून यात पुणे-दुबई-पुणे आणि पुणे-बँकॉक-पुणे या मार्गांचा समावेश आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 19 Sep 2024
  • 07:06 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुण्याहून बँकॉक, दुबईला आता थेट विमानसेवा उपलब्ध असणार आहे. नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री  मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली.

आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर माहिती देताना मोहोळ म्हणाले की, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी दोन नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे येत्या २७ ऑक्टोबर, २०२४ पासून सुरु होत असून यात पुणे-दुबई-पुणे (Pune to Dubai Flight) आणि पुणे-बँकॉक-पुणे (Pune to Bangkok Flight) या मार्गांचा समावेश आहे. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना याचा निश्चितच फायदा होणार आहे. या संदर्भात नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री  मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी माहिती दिली आहे. 

दरम्यान, यातील पुणे-दुबई-पुणे ही सेवा दररोज उपलब्ध असणार असून पुणे-बँकॉक-पुणे यामार्गावर आठवड्यातून तीनदा विमानसेवा उपलब्ध असणार आहे. येत्या २७ ऑक्टोबर, २०२४ पासून ही आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार आहे.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest