ससूनच्या क्लिनिकल सर्व्हिस लॅबोरेटरीला एनएबीएल प्रमाणपत्र

पुणे: बी.जे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथिल क्लिनिकल सर्व्हिस लॅबोरेटरीला नॅशनल ॲक्रिडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग ॲन्ड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीजचे (एन.ए.बी.एल) प्रमाणपत्र प्राप्त् झाले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 19 Sep 2024
  • 03:20 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे: बी.जे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथिल क्लिनिकल  सर्व्हिस लॅबोरेटरीला  नॅशनल ॲक्रिडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग ॲन्ड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीजचे  (एन.ए.बी.एल) प्रमाणपत्र प्राप्त् झाले आहे.  एनएबीएल प्रमाणपत्र  प्राप्त  प्रयोगशाळा म्हणजे गुणवत्तेत अग्रगण्य प्रयोगशाळा असून यामुळे बी.जे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे लॅबच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यांच्यापैकी नॅशनल ॲक्रिडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग ॲन्ड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीजचे  (एन.ए.बी.एल) प्रमाणपत्र प्राप्त करणारी बी.जे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथिल क्लिनिकल  सर्व्हिस लॅबोरेटरी ही एकमेव संस्था आहे.

क्लिनिकल  सर्व्हिस लॅबोरेटरीमध्ये बायोकेमिस्ट्री, पॅथॉलॉजी व मायक्रोबायोलॉजी  या विभागांच्या प्रयोगशाळा येतात. प्रयोगशाळेतील तपासण्यात येणाऱ्या चाचण्यांची गुणवत्ता व त्यासाठी राबविली जाणारी यंत्रणा कशी कार्यरत आहे, चाचण्यांचे नमुने घेणे, रिपोर्ट देणे व रिपोर्टची माहिती ठेवणे  या सर्व बाबी तपासून  एन.ए.बी.एल. ची टीम प्रमाणपत्र प्रदान करते. या मान्यतेमुळे  या प्रयोगशाळेमधून दिल्या जाणाऱ्या अहवालांना विशेष महत्व असणार आहे. गुणवत्तेच्या कडक निकषांमुळे रुग्ण निदान व उपचारांसाठी यामुळे साहाय्‍य होणार आहे.

एनएबीएल प्रमाणपत्र मिळविण्यासाठी बायोकेमिस्ट्रीचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. सेामनाथ सलगर, मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते व पॅथॉलॉजी विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. लीना नकाते  व त्यांच्या  टीमने परिश्रम घेतले.

एनएबीएल प्रमाणपत्र मिळविण्यासाठी बी.जे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणेचे अधिष्ठाता, डॉ. एकनाथ पवार यांचे ससून क्लिनीकल सर्व्हिस लॅबोरेटरी टीमला वेळावेळी मार्गदर्शन लाभले. प्रमाणपत्र प्राप्त  केल्या बद्दल त्यांनी टीमचे  अभिनंदनही केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest