पुण्याची संस्कृती बिघडू दिली जाणार नाही, पोलिसांनी ॲक्शन मोडमध्ये यावे - मेधा कुलकर्णी

पुणे शहरामध्ये चालू असलेले गैरप्रकारांचे सत्र आटोक्यात आणण्यासाठी शासन, प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले असून फर्ग्युसन कॉलेज येथील बारच्या मालकावर, चालकावर आणि अन्य काही लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Mon, 24 Jun 2024
  • 07:31 pm

संग्रहित छायाचित्र

पुणे शहरामध्ये चालू असलेले गैरप्रकारांचे सत्र आटोक्यात आणण्यासाठी शासन, प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले असून फर्ग्युसन कॉलेज येथील बारच्या मालकावर, चालकावर आणि अन्य काही लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्याचबरोबर बेजबाबदार वर्तन केल्याबद्दल पीआय, एपीआय आणि दोन बिट मार्शल यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे आणि त्यांना सस्पेंड करण्यात आले आहे. अशाच पद्धतीने पोलिसांनी ॲक्शन मोड मध्ये येऊन पुणे शहरांमधील सर्व अवैध गोष्टींना आळा घालावा. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या आयुक्तांनीही अवैध अनधिकृत व बार आणि रूप टॉप हॉटेल्स वर त्वरित कार्यवाही कारवाई करावी अशी आग्रहाची मागणी राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे. 

खासदार कुलकर्णी म्हणाल्या, पुणे शहराची सांस्कृतिक ओळख कुठल्याही पद्धतीने बदलू दिली जाणार नाही,  गैरगोष्टी अजिबात खपवून घेतल्या जाणार नाहीत.  गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही त्वरित आणि कडक कारवाईचे दिले आहेत. 

खासदार कुलकर्णी पुढे म्हणाल्या, विरोधी पक्षाच्या आरोपांबद्दलच बोलायचे तर यापूर्वीही काँग्रेसच्या एका आमदाराने आणि विरोधी पक्षाच्या एका महिला पदाधिकारी यांनी यापूर्वी जे आरोप केले होते, त्याचा त्यांनी काय पाठपुरावा केला ? त्या विषयात त्या गप्प का? माझी मागणी आहे की एक्साईज खात्यातील अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्या बद्दल त्या आरोपांचे काय झाले याची चौकशी झाली पाहिजे. आता ते गप्प का अशा प्रकारचा प्रश्न  जनता उपस्थित करीत आहे. त्यांनी जे आरोप केले होते त्या पोलीस अधिकाऱ्यांची आणि एक्साईज अधिकाऱ्यांची चौकशी करून ते जर दोषी असतील तर अशा दोषी अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी आणि जर ते दोषी नसतील तर  खोटे आरोप केल्याबद्दल कारवाई करावी अशा प्रकारची आग्रही मागणी खासदार कुलकर्णी यांनी केली. 

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest