आता छेडछाडीची तक्रार करा व्हाट्सअ‍ॅपवर, पोलीस आयुक्तांकडून नंबर जाहीर

पुणे पोलीस आयुक्तांनी व्हाट्सअ‍ॅपवर जाहीर केला आहे. यावर छेडछाड झाल्यास तात्काळ तक्रार नोंदविण्याचे आवाहन आयुक्त रितेश कुमार यांनी केले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 11 Jul 2023
  • 11:01 am
पोलीस आयुक्तांकडून नंबर जाहीर

पोलीस आयुक्तांकडून नंबर जाहीर

पुण्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत चालली आहे. कोयता गँगचा धुडगूस, महिलांची छेडछाड, मारहाण यासह अन्य घटना घडत आहेत. पोलीसांकडून कोम्बिंग ऑपरेशन राबवून देखील गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नाहीये. राजगडच्या पायथ्याशी दर्शनाची हत्या असेल किंवा सदाशिव पेठेतील महाविद्यालयीन तरुणीवरील कोयता हल्ला, असा घटना घडताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तांनी व्हाट्सअ‍ॅपवर जाहीर केला आहे. यावर छेडछाड झाल्यास तात्काळ तक्रार नोंदविण्याचे आवाहन आयुक्त रितेश कुमार यांनी केले आहे.

कोणताही अनुचित प्रकार आढळून आल्यास शाळकरी मुली, तरुणी, तसेच नागरिकांनी थेट व्हाटसॲप क्रमांकावर (व्हॉटसॲप क्रमांक- ८९७५९५३१००) तक्रार करावी. तातडीची मदत हवी असल्यास किंवा काही अनुचित प्रकार आढळल्यास त्वरीत पोलीस नियंत्रण कक्षात (संपर्क क्रमांक- ११२) तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी केले आहे.

शहरातील गुंडगिरी मोडून काढण्यासाठी नागरिकांच्या अडीअडचणी जाणून त्यानुसार कारवाई करण्यासाठी हेल्पलाइन सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. एखादी अनुचित घटना आढळून आल्यास नागरिक तक्रार करू शकतात. नागरिकांची तक्रार पोलिस ठाणे, दामिनी पथक आणि गुन्हे शाखेला कळवून तातडीने कारवाई करण्यात येईल. पोलिस आयुक्त रितेश कुमार स्वत: हेल्पलाईनवर लक्ष ठेवणार आहेत, असे सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest