पुणे विमानतळावरील नवे टर्मिनल लवकरच खुले होणार: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर साकारलेले नवे टर्मिनल आता वापरासाठी सज्ज होत असल्याची माहीती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. पुढील काही दिवसांत नवीन टर्मिनल सुरू होईल असे ते म्हणाले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Sat, 29 Jun 2024
  • 02:08 pm

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर साकारलेले नवे टर्मिनल आता वापरासाठी सज्ज होत असल्याची माहीती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. पुढील ८ ते १० दिवसांत नवीन टर्मिनल सुरू होईल असे ते म्हणाले. 

मोहोळ म्हणाले,  नवे टर्मिनल सुरु करण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सीआयएसएफच्या मनुष्यबळाला मंजुरी मिळाली आहे. सीआयएसएफच्या २२२ पदांना मंजुरी मिळाली आहे. गृहमंत्री अमित शाह यांना या कामासंदर्भात पत्र पाठवून नुकतीच त्यांची भेटही घेतली होती.  भेटीनंतर त्यांनी लगेचच मनुष्यबळाला तातडीने परवानगी दिली असल्याचे त्यांनी सांगितले. 

पुण्याची तुलना पंजाबशी नको

पुणे शहरात अमली पदार्थांशी संबंधित घटना वाढत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातून पोलीस, प्रशासनावर टिका होत आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे शहराची अवस्था 'उडता पंजाब' सारखी होत असल्याची टिका केली होती. आज केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी धंगेकर यांचं नाव न घेता पुण्याची तुलना पंजाबशी न करण्याची तसेच शहराचं नाव खराब होईल अशी वक्तव्ये टाळण्याचा मैत्रीचा सल्ला धंगेकर आणि इतर राजकीय नेत्यांना दिला आहे. आज पुण्यात ते माध्यमांशी बोलत होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest