Maratha Reservation : मराठा समाजाने कधी जातीवाद केला नाही – मनोज जरांगे पाटील

मराठा समाजानं प्रत्येकाला आधार देण्याचं काम केलं. मराठा सढळ हाताने इतरांना देत राहीला. आरक्षण देताना ही, कोणाला मिळाले आणि आम्हाला का मिळाले नाही याविषयी ब्र शब्द काढला नाही, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Maratha Reservation : मराठा समाजाने कधी जातीवाद केला नाही – मनोज जरांगे पाटील

मराठा समाजाने कधी जातीवाद केला नाही – मनोज जरांगे पाटील

मराठा समाजाने कधी जातीवाद केला नाही. प्रत्येकाचा सुख, दुःखात माझा मराठा धावून गेला. मराठ्यांनी कधीच कोणाची जात शोधली नाही. मराठा समाजानं प्रत्येकाला आधार देण्याचं काम केलं. मराठा सढळ हाताने इतरांना देत राहीला. आरक्षण देताना ही, कोणाला मिळाले आणि आम्हाला का मिळाले नाही याविषयी ब्र शब्द काढला नाही, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांची आज पुण्यातील खराडी येथे सभा झाली. यावेळी त्यांनी भर उन्हात बसलेल्या मराठा बांधवांना संभोधित केले. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, आरक्षण देताना देखील आम्ही कधीच भेदभाव केला नाही. याला जास्त का आणि आम्हाला कमी का असा सवाल कधीच केला नाही. स्वतःच्या हक्कच आरक्षण दुसऱ्याला दिलं. पण घेऊ नका, असं म्हटलं नाही. आरक्षण सागक्यांना देऊ दिलं. सगळ्यांसाठी माझ बांधव उभा राहिला.

आम्ही सगळ्या समाजाला सढळं हाताने मदत केली. आम्ही आरक्षण देताना कधीच मागे पुढे बघितलं नाही आणि आजही दुसऱ्यांना मदत करताना आमचा हात मागे पुढे सरकत नाही. माझ्या समाजाचा विश्वास प्रबळ होता. आम्ही देशात कधीच कुणाला कमी पडू दिला नाही. सगळ्या जातीतल्या लोकांना मदत करणारा हा समाज आहे. कुणावर संकट आले तर छातीचा कोट करून आम्ही थांबली. कधीच कुणाला कमी लेखलं नाही. जातीवाद न करण्याचा संस्कार दिला. त्याच पावलावर पाऊल ठेवत आपण पुढे जात आहोत. आमच्या हक्काच्या आरक्षणाची मागणी करत आहोत, असेही यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest