जीवनदायीनीच ठरली जीवघेणी; जेष्ठ नागरिकाला रुग्णावाहिकेने चिरडले

पार्किंगमधील रुग्णवाहिका मागे घेत असताना चालकाने एका ज्येष्ठ नागरिकाला चिरडल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत नागरिकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात जुन्नर तालुक्यातील ओतुर येथील बसस्थानक परिसरात घडला आहे. थरारक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 10 Jul 2023
  • 03:44 pm
accident : जीवनदायीनीच ठरली जीवघेणी; जेष्ठ नागरिकाला रुग्णावाहिकेने चिरडले

जेष्ठ नागरिकाला रुग्णावाहिकेने चिरडले

उपचारादरम्यान नागरिकाचा मृत्यू, जुन्नर तालुक्यातील घटना

पुण्यातील जुन्नर तालुक्यात जीवदान देणारी रुग्णवाहिकाच जीवघेणी ठरल्याचे समोर आले आहे. पार्किंगमधील रुग्णवाहिका मागे घेत असताना चालकाने एका ज्येष्ठ नागरिकाला चिरडल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत नागरिकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात जुन्नर तालुक्यातील ओतुर येथील बसस्थानक परिसरात घडला आहे. थरारक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत आहे.

रज्जाक मुंढे असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील बस स्थानकात प्रवासी वृद्ध उभा होता. त्यावेळी एक रुग्णवाहिका पार्किंगमधून बाहेर येत होती. रुग्णवाहिका चालकाने स्टॉपवर उभा असलेल्या प्रवाशाला एकदा चिरडले. मात्र हा प्रकार त्याच्या लक्षात न आल्याने गाडी मागे घेताना पुन्हा चिरडले.

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या नागरिकाला त्याचा रुग्णावाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, दुर्दैवाने जेष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. घटनेचा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest