लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनने मागविला ट्रेनी आयएएस अधिकारी डॉ. पूजा खेडकरचा सविस्तर अहवाल !

लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (LBSNAA) ने महाराष्ट्र सरकारकडून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ट्रेनी आयएएस अधिकारी डॉ. पूजा खेडकर यांच्याबद्दल सविस्तर अहवाल मागवला असल्याची माहिती समोर येत आहे.

Dr. Pooja Khedkar

लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनने मागविला ट्रेनी आयएएस अधिकारी डॉ. पूजा खेडकरचा सविस्तर अहवाल !

लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (LBSNAA) ने महाराष्ट्र सरकारकडून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ट्रेनी आयएएस अधिकारी डॉ. पूजा खेडकर यांच्याबद्दल सविस्तर अहवाल मागवला असल्याची माहिती समोर येत आहे. ट्रेनी IAS अधिकारी डॉ. पूजा खेडकर (Dr. Pooja Khedkar) यांनी IAS होण्यासाठी आपण अंशतः अंध असल्याचं प्रमाणपत्र दिलं होतं. तसेच, त्यांनी पोस्ट मिळवण्यासाठी बनावट OBC जात प्रमाणपत्र दिल्याचाही आरोप त्यांच्यावर केला जात आहे.

वादानंतर नागरी सेवा परीक्षेत निवडीसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबाबतही आता नवी माहिती समोर आली आहे. त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (UPSC) सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दृष्टिहीन आणि मानसिक आजारी असल्याचा दावा केल्याची माहिती मिळत आहे. 

डॉ. पूजा खेडकर यांच्या निवडीला UPSC नं दिलेलं आव्हान !

जिल्हाधिकाऱ्यांपेक्षाही जास्त रुबाब दाखवणाऱ्या ट्रेनी आयएएस अधिकारी डॉ. पूजा खेडकर यांच्या निवडीला यूपीएससीनंही आव्हान दिलेलं. UPSC नं खेडकरांच्या निवडीला केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (CAT) मध्ये आव्हान दिलं होतं. त्यानंतर केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणानं पूजा खेडकरांविरोधात निर्णय दिला होता. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांच्या विरोधात निर्णय देऊनही त्यांचं एमआरआय प्रमाणपत्र स्वीकारण्यात आलं, ज्यामुळे त्यांची आयएएस नियुक्ती निश्चित झाली. अपंगत्वाच्या दाव्याव्यतिरिक्त, पूजा खेडकरच्या ओबीसी नॉन-क्रिमी लेयर दर्जाच्या दाव्यांमध्येही विसंगती आढळून आली.

IAS ची पात्रता कशी मिळवली?

पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती 40 कोटी असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. त्यांच्या वडिलांची संपत्ती लक्षात घेता पूजा खेडकर यांची ओबीसी नॉन क्रिमी लेअर दर्जासाठी पात्र कशा ठरल्या? हा मोठा प्रश्न आहे, असं आरआयटीचे कार्यकर्ते विजय कुंभार यांनी म्हटलं आहे. दिलीप खेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर 2024 ची लोकसभा निवडणूक लढवली होती, मग पूजा खेडकर नॉन क्रिमी लेअरमध्ये कशा मोडतील? असा सवालही आरआयटीचे कार्यकर्ते विजय कुंभार यांनी उपस्थित केला आहे. तसेच, पूजा खेडकर यांनी मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचं सांगितलं होतं. तसेच, अंशतः अंध असून विविध प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तरीदेखील पूजा खेडकर यांनी वैद्यकीय चाचणीत सहभागी होण्यास वारंवार नकार दिला आणि तरीसुद्धा त्या आयएएससाठी पात्र ठरल्या कशा, असा प्रश्नही विजय कुंभार यांनी उपस्थित केला आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest