रिक्षा चालकाची इमानदारी, प्रवाशी महिलेचा आयफोन केला परत

कोणत्याही मोहाला बळी न पडता रिक्षा चालकाने मुंढवा परिसरात राहणाऱ्या महिलेचा आयफोन परत केल्यामुळे पोलीसांकडून चालकाचे कौतुक करण्यात आले आहे. सुमारे ३५ हजार रुपये किमतीचा हा फोन असल्याचे सांगण्यात आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 11 Jul 2023
  • 01:12 pm
Mundhawa : रिक्षा चालकाची इमानदारी, प्रवाशी महिलेचा आयफोन केला परत

संग्रहित छायाचित्र

मुंढवा पोलीसांकडून रिक्षा चालकाचे कौतुक

पुण्यातील एका रिक्षा चालकाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. चालकाने इमानदारी बाळगत एका प्रवाशी महिलेचा रिक्षात विसरलेला आयफोन पोलीसांच्या सहाय्याने परत केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार मुंढवा-केशवनगर परिसरात घडला आहे. कोणत्याही मोहाला बळी न पडता रिक्षा चालकाने मुंढवा परिसरात राहणाऱ्या महिलेचा आयफोन परत केल्यामुळे पोलीसांकडून चालकाचे कौतुक करण्यात आले आहे. सुमारे ३५ हजार रुपये किमतीचा हा फोन असल्याचे सांगण्यात आले आहे.

संतोष किसनराव शिंदे (रा. सागर निवास, लोणकर चौक, केशवनगर, मुंढवा, पुणे) असे रिक्षा चालकाचे नाव आहे. संतोष यांनी एका मुंढवावरून केशवनगरमधील आर. बी. स्कुलजवळ प्रवाशाी महिलेला सोडले. प्रवास झाल्यानंतर प्रवाशी आणि रिक्षा चालक यांचे आपसात भाड्याचे देणे घेणे झाले. त्यानंतर संतोष शिंदे हे आपली रिक्षा घेवून पुढील ग्राहकाची वाट पाहत रस्त्याचे कडेला थांबले होते. यादरम्यान रिक्षाचे मागील सिटवर त्यांची नजर गेली. तेव्हा त्यांना एक मोबाईल (स्मार्ट फोन) दिसला तेव्हा त्यांनी थोड्यावेळापुर्वी प्रवाशी सोडलेल्या ठिकाणी जावून आजूबाजूस ग्राहकाचा शोध घेतला. मात्र, प्रवाशी महिला कुठेच दिसली नाही.

अखेर रिक्षा चालक शिंदे यांनी सदरचा मोबाईल फोन मुंढवा पोलीस ठाण्यात जमा केला. पोलीसांनी मोबाईलच्या मालकाची माहिती घेवून सदरचा मोबाईल सापडला असून मुंढवा पोलीस ठाण्यात असल्याचे कळविले. पोलीसांनी महिलेला बोलावून घेतले. सदर मोबाईलची खात्रीकरून महिलेला मोबाईल फोन परत केला. ही महिला मुळची हैद्राबाद येथील आहे. तिच्या फोनची किंमत सुमारे ३५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, इमानदारी आणि माणुसकी पाहून रिक्षा चालक संतोष किशनराव शिंदे यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विष्णू ताम्हाणे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप काकडे यांनी कौतूक केले. तसेच त्यांचा श्रीफळ व फुलांचा गुच्छ देवून सत्कार करण्यात आला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest