Youth dies after drowning : पाच फूट तलावात बुडून युवकाचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या जलतरण तलावात पाच फुटांच्या अंतरामध्ये बुडून सतरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. या प्रकरणी साईॲक्वा मरिन जलतरण तलाव, तसेच जीवरक्षक यांच्यावर हलगर्जीपणा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, राहुल महंतप्पा वाघमोडे असे मृत मुलाचे नाव आहे. या प्रकरणी सुरज वाघमोडे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 18 May 2023
  • 11:17 am
पाच फूट तलावात बुडून युवकाचा मृत्यू

पाच फूट तलावात बुडून युवकाचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या जलतरण तलावात पाच फुटांच्या अंतरामध्ये बुडून सतरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. या प्रकरणी साईॲक्वा मरिन जलतरण तलाव, तसेच जीवरक्षक यांच्यावर हलगर्जीपणा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, राहुल महंतप्पा वाघमोडे असे मृत मुलाचे नाव आहे. या प्रकरणी सुरज वाघमोडे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

राहुल हा साईॲक्वा जलतरण तलावात मित्रांसह पोहण्यासाठी गेला होता. त्याने पाण्यात उडी मारली. परंतु, तो पाण्यातून वर आलाच नाही, म्हणून त्याच्या मित्रांनी राहुलला बाहेर काढले. मात्र, त्याची हालचाल थांबली असल्याचे समजताच त्याला लगेच नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत आहे. यामुळे अनेक मुले-मुली जलतरण तलावाकडे वळत असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु, मंगळवारी घडलेल्या घटनेमुळे जलतरण तलावात पोहण्यासाठी जाणाऱ्या मुला-मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. राहुल याची उंची आणि तो केवळ पाच फुटांमध्ये बुडाला असल्याने हा अपघात होता की घातपात याची पडताळणी पोलिसांकडून सुरू आहे. आम्ही सर्व शक्यता पडताळून पाहात असल्याची माहिती चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डी. बी. काटकर यांनी दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest