वादळी वाऱ्यामुळे मोशीत कोसळले होर्डिंग
विकास शिंदे
पिंपरी-चिंचवड: शहरातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. वादळी वाऱ्यात मोशी येथील लोखंडी होर्डिंग कोसळले आहे. सुदैवाने यात जीवितहानी किंवा कोणीही जखमी झालेले नाही. रस्त्याच्या कडेला असलेले लोखंडी होर्डिंग सुदैवाने रस्त्यावर आणि शेजारी घरावर पडले नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. मात्र, हे होर्डिंग अधिकृत असून त्याचे स्ट्रक्चरल स्थिरता प्रमाणपत्र आहे, अशी माहिती उपायुक्त संदीप खोत यांनी दिली.
पिंपरी- चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील मोशी (Moshi) येथे दुपारी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या वादळी वाऱ्यात रस्त्यालगत असलेले मोठे लोखंडी होर्डिंग कोसळले. हे होर्डिंग गांधी अॅडव्हायर्टाजिंग या एजन्सीचे आहे. हे होर्डिंग कोसळल्याने रस्त्यालगत पार्क केलेल्या चार दुचाकी आणि टेम्पोचे नुकसान झाले आहे. नुकतेच, मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून १६ जणांचा मृत्यू झालेला आहे. या घटनेनंतर अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिंपरी- चिंचवड शहरातही अनधिकृत होर्डिंगचे ऑडिट करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान ही घटना घडली. दरम्यान, महापालिकेने होर्डिंग सर्वे सुरू केला आहे. दोन दिवसात हे सर्वे पूर्ण होईल. सोमवारनंतर होर्डिंगवर कारवाई करण्यात येणार आहे, असेही खोत यांनी सांगितले. (Hoarding collapse in Moshi)
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.