मोशी येथील होर्डिंग कोसळल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

मोशी येथे होर्डिंग कोसळल्याची (Hoardings collapsed) घटना गुरुवारी (१६ मे) सायंकाळी घडली. त्या होर्डिंगची मजबुतीकरणाच्या दाखल्याची मुदत संपली असताना देखील होर्डिंग मालकाने त्याबाबत खबरदारी घेतली नाही.

Hoardings collapsed

मोशी येथील होर्डिंग कोसळल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

मोशी येथे होर्डिंग कोसळल्याची (Hoardings collapsed)  घटना गुरुवारी (१६ मे) सायंकाळी घडली. त्या होर्डिंगची मजबुतीकरणाच्या दाखल्याची मुदत संपली असताना देखील होर्डिंग मालकाने त्याबाबत खबरदारी घेतली नाही. तसेच मजबुतीकरणाचे नूतनीकरण केले नसल्याने होर्डिंग मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आनंद रमणलाल गांधी (वय ३८, रा. महर्षीनगर पुणे), स्ट्रक्चर डिझायनर हेमंत कुमार शिंदे (रा. कात्रज पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पालिकेच्या वतीने ग्यानचंद हरी भाट यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद पब्लिसिटी या कंपनीचा ४० फूट बाय २० फूट आकाराचे होर्डिंग मोशीमधील तापकीरनगर येथे बसवण्यात आले होते. 

त्या होर्डिंगची मजबुतीकरणाच्या दाखल्याची मुदत संपली होती. तिचे मुदतीत नूतनीकरण केले नव्हते. तसेच या होर्डिंगबाबत कोणतीही खबरदारी घेतली गेली नव्हती. दरम्यान गुरुवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात हे होर्डिंग कोसळले. यामध्ये तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले. तसेच एका दुकानाचेही नुकसान झाले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest