पिंपरी-चिंचवड: डांगे चौकात खडीच खडी; सकाळी वाहतूक खोळंबली
पिंपरी-चिंचवड: भर रस्त्यात मोठ्या प्रमाणात दगड आणि खडी पसरल्याने भल्या सकाळीच वाहतुक विस्कळीत झाली. एकही पोलीस कर्मचारी तेथे उपस्थित नसल्याने वाहनाच्या रांगा लागल्या होत्या . दरम्यान हि दगडे अडकल्याने वाहने काढण्यासाठी मोठी पंचायत झाली.
दररोज प्रमाणे नागरिक आपल्या कामानिमित्त व्यवसायासाठी बाहेर पडले होते. त्यात सकाळी ऑफिस वेळेत जाण्यासाठी धडपडत असलेले नागरिकांना हा मोठा अडथळात ठरला. डांगे चौकात सकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या ठिकाणी मजूर अड्डा असल्याने तसेच, आयटी पार्ककडे जाण्यासाठी कर्मचारी बसची वाट पाहत त्या ठिकाणी थांबलेले असतात.
दरम्यान, सकाळीच या ठिकाणी रस्त्यावर मधोमध मोठ्या प्रमाणात दगड, माती, खडी अशा प्रकारचे साहित्य पडले होते. मात्र, दोन-तीन तास उलटून देखील त्या ठिकाणी कोणी दाखल झाले नाही. याची माहिती सिविक मिररच्या प्रतिनिधीला समजतात त्यांनी संबंधित तक्रार महापालिकेकडे केली. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाला देखील याची माहिती दिली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.