वल्लभनगर : एसटी बस शिवशाही बसवर आदळली, कर्मचारी महिलेचा चेंगरून मृत्यू

पिंपरी चिंचवडमधील वल्लभनगर एसटी आगारातून एसटी बस काढताना ब्रेक न लागल्याने ती समोर उभ्या असलेल्या शिवशाही बसवर आदळली. यावेळी ऑइल चेक करत असलेली कर्मचारी महिला या दोन्ही बसमध्ये चेंगरली गेली. यात गंभीर जखमी झाल्याने कर्मचारी महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी सकाळी आठच्या सुमारास घडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 9 May 2023
  • 01:33 pm
एसटी बस शिवशाही बसवर आदळली, कर्मचारी महिलेचा चेंगरून मृत्यू

एसटी बस शिवशाही बसवर आदळली, कर्मचारी महिलेचा चेंगरून मृत्यू

ब्रेक फेल झाल्यामुळे एसटी बस आदळली शिवशाही बसवर

पिंपरी चिंचवडमधील वल्लभनगर एसटी आगारातून एसटी बस काढताना ब्रेक न लागल्याने ती समोर उभ्या असलेल्या शिवशाही बसवर आदळली. यावेळी ऑइल चेक करत असलेली कर्मचारी महिला या दोन्ही बसमध्ये चेंगरली गेली. यात गंभीर जखमी झाल्याने कर्मचारी महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी सकाळी आठच्या सुमारास घडली.

शिल्पा कैलास गेडाम (वय ३३) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून त्या मॅकेनीक विभागातील सहायक कारागीर या पदावर कार्यरत होत्या. या प्रकरणी वसंय यमाजी रावते (वय ५३) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार बस चालक प्रशांत रमेश वाडकर (वय ३३) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप चालक प्रशांत यांना अटक करण्यात आलेली नाही.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील वल्लभनगर आगारात शिल्पा गेडाम या शिवशाही बसचे ऑईल चेक करत होत्या. यावेळी परतूर आगाराच्या बसचे वाहक प्रशांत रमेश वाडकर हे अहमदपूर आगाराची बस बाजूला काढण्यासाठी चालकाच्या सीटवर बसले. त्यांनी ती बस सुरू केली. मात्र, बसमध्ये हवा कमी असल्याने ब्रेक लागलाच नाही.

बसचा ब्रेक न लागल्यामुळे समोर असलेल्या शिवशाही बसवर ती आदळली. यामध्ये शिवशाही बसमधील ऑईलची तपासणी करणाऱ्या ‍शिल्पा गेडाम या दोन्ही बसमध्ये सापडून गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी तातडीने रूग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी वल्लभनगर आगार प्रशासनाच्यावतीने पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest