Pimpri-Chinchwad: एफडीएकडून तीन ठिकाणी औषधविक्रेत्यांवर कारवाई

आजार बरा करण्याबाबत दिशाभूल करणारे दावे केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) पुणे विभागाच्या वतीने पुणे जिल्ह्यात तीन ठिकाणी औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 17 Oct 2024
  • 03:38 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

४६ हजार ३२७ रूपयांची औषधे जप्त

आजार बरा करण्याबाबत दिशाभूल करणारे दावे केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) पुणे विभागाच्या वतीने पुणे जिल्ह्यात तीन ठिकाणी औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण ४६ हजार ३२७ रुपये रकमेची औषधे जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, आणखी काही तक्रारी प्राप्त झाल्या असून, शहानिशा करणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.  एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत ही कारवाई करण्यात आली.

चिंचवड-मयूर ट्रेड सेंटर येथील न्यू मारुती आयुर्वेद या दुकानात विक्रीस असलेल्या औषधांच्या लेबलवर मधुमेह बरा करण्याचा आक्षेपार्ह दावा केल्याचे आढळले. त्यामुळे औषध निरीक्षक म.बा. कवटीकवार यांनी ३६ हजार ६०० रुपये किमतीची औषधे जप्त केली. तसेच, मुख्य न्यायदंडाधिकारी (पुणे) यांच्या न्यायालयात खटला दाखल केला आहे. पुण्यातील सदाशिव पेठ येथील अमित मेडिको या औषधाच्या दुकानात विक्रीस असलेल्या एका औषधाच्या लेबलवर संधिवात बरा करण्याचा दावा केल्याचे आढळले. औषध निरीक्षक रजिया शेख यांनी संबंधित आयुर्वेदिक औषधाचा ५ हजार ७२७ रुपये किमतीचा साठा जप्त केला. तसेच पुढील कारवाई सुरु आहे. याबाबत काही नमुनेही जप्त करण्यात आले आहेत. बारामती येथे केलेल्या तिसऱ्या कारवाईत महालक्ष्मी आयुर्वेदिक या औषधाच्या दुकानात एका औषधाच्या लेबलवर किडनीस्टोन हा आजार बरा करण्याचा दावा केल्याचे आढळले. त्यामुळे औषध निरीक्षक स.शि. बुगड यांनी या आयुर्वेदिक औषधाचा ४ हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला. तसेच, पुढील कारवाई सुरू आहे. सहआयुक्त गिरीश हुकरे (औषधे) पुणे विभाग यांच्या मार्गदर्शनामध्ये संबंधित कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत  हुकरे यांनी सांगितले की, रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गंभीर आजाराबाबत स्वतः उपचार करु नये. अशा कोणत्या मेडिकल मध्ये परस्पर आजार आला बरा करण्याबाबत औषधे विक्री होत असल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार आहे. औषधांच्या फसव्या, दिशाभुल करणाऱ्या जाहिरातींना बळी पडू नये.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest