Pimpri-Chinchwad: वायसीएम रुग्णालयाच्या कॉलेजच्या नावात होणार बदल; महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची घेतली मान्यता

पिंपरी येथील संत तुकारामनगर, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील बी. एस्सी. नर्सिंग कॉलेजचे नाव पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिचर्या विज्ञान संस्था यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय असे नाव करण्यात आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 17 Oct 2024
  • 03:30 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पिंपरी येथील संत तुकारामनगर,  यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील बी. एस्सी. नर्सिंग कॉलेजचे नाव पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिचर्या विज्ञान संस्था यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय असे नाव करण्यात आले आहे. पॅरामेडीकल कोर्सेससाठी असलेल्या संस्थेचे नाव पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पॅरावैद्यकीय प्रशिक्षण संस्था यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय असे केले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने वायसीएम रुग्णालयाच्या अंतर्गत सुरु असलेल्या बीएस्सी नर्सिंग कॉलेज आणि पॅरामेडीकल कोर्सेस संस्थेला आवश्यक प्रमाणपत्र आणि संलग्नता मिळण्यासाठी संस्थेची नावे निश्चित करणे आवश्यक होते. त्यानुसार हा निर्णय घेतला आहे. वायसीएम रुग्णालय अंतर्गत बी.एस्सी. नर्सिंग कॉलेज सुरु करण्याच्या विषयास राज्य शासनाच्या वतीने मान्यता देण्यात आली होती. त्या अनुषंगाने शासनाकडील वैधानिक तपासणी समिती प्राथमिक तपासणी करून संस्थेला आवश्यकता प्रमाणपत्र आणि संलग्नता मिळण्यासाठी एमयुएचसीकडे शिफारस करते. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे या प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यापूर्वी या संस्थेचे नाव निश्चित करणे गरजेचे होते.

त्यानुसार सोमवारी (दि.१५) झालेल्या सर्वसाधारण सभेत बी. एस्सी. नर्सिंग कॉलेजचे नाव पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिचर्या विज्ञान संस्था यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय  (पीसीएमसी आयएनएस वायसीएमएच) असे निश्चित करण्यात आले आहे. पॅरामेडीकल कोर्सेस संस्थेचे नाव पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पॅरावैद्यकीय प्रशिक्षण संस्था यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (पीसीएमसी पीटीआय वायसीएमएच) असे निश्चित करण्यात आले आहे. या विषयास प्रशासक शेखर सिंह यांनी सर्वसाधारण सभेची मान्यता दिली आहे.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest