Pimpri-Chinchwad: अनधिकृत फ्लेक्स लावल्यास आता दाखल होणार गुन्हे

पिंपरी-चिंचवड: महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतरही शहरात झळकणाऱ्या फ्लेक्सवर कारवाई करण्यास प्रशासनाने प्रारंभ केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 17 Oct 2024
  • 06:02 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

महापालिकेचा आकाशचिन्ह व परवाना विभाग झाला सक्रिय

पिंपरी-चिंचवड: महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतरही शहरात झळकणाऱ्या फ्लेक्सवर कारवाई करण्यास प्रशासनाने प्रारंभ केला आहे. ही कारवाई आणखी कठोर होणार असल्यामुळे अनधिकृतपणे संपर्क कार्यालय सुरू करू नयेत, तसेच पोस्टर्स लावू नयेत, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम मंगळवारी (दि.१५) जाहीर झाल्यानंतर त्याच दिवसापासून आचारसंहिता लागू झाली आहे. त्याची कडक अंमलबजावणी करण्यास प्रशासनाने सुरुवातही केली आहे. ज्याठिकाणी आचारसंहितेचा भंग झाला आहे, अशा ठिकाणी नियमानुसार कारवाईला प्रारंभ झाला आहे. त्यानुसार, महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या वतीने अनधिकृच फ्लेक्स, बॅनर्स काढण्यात आले.

आचारसंहिता लागण्यापूर्वी विविध निविदा मंजूर करण्यासोबतच मंजूर झालेल्या कामाच्या कार्यारंभ आदेश काढण्यासाठी महापालिकेत दोन दिवस धावपळ सुरू होती. आचारसंहितेमध्ये आपल्या भागातील विकासकामांच्या निविदा अडकून पडू नये, या निविदा मान्य होऊन काम सुरू करण्याची परवानगी मिळावी, यासाठी शहरातील विद्यमान आमदारांसह आजी-माजी नगरसेवकांची आणि ठेकेदारांची गर्दी पालिकेत पहायला मिळाली. अधिकाधिक विकासकामे मार्गी लागावी यासाठी रात्री उशिरापर्यंत काही विभाग आणि तेथील अधिकारी महापालिकेत कार्यरत होते.

महापालिका कार्यक्षेत्रात विनापरवाना राजकीय पक्षाचे झेंडे, बॅनर्स, प्लेक्स आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे प्रशासनाने कळवले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांनी सभेसाठी मैदान, सभागृह याबाबत परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी विशेष कक्ष सुरू करण्यात येणार आहे.
- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest