देहूगावातून दोन चिमुकले बेपत्ता, अपहरणाचा संशय

राहत्या घरातून दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची घटना घडली. ही घटना देहूगावातील विठ्ठलवाडी परिसरात शनिवारी घडली. निखिल वर्मा (८), नितीन वर्मा (६) अशी या बेपत्ता झालेल्या मुलांची नावे आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 8 May 2023
  • 10:23 am
देहूगावातून दोन चिमुकले बेपत्ता

देहूगावातून दोन चिमुकले बेपत्ता

देहूरोड पोलीसांत अपहरणाचा गुन्हा दाखल

राहत्या घरातून दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची घटना घडली. ही घटना देहूगावातील विठ्ठलवाडी परिसरात शनिवारी घडली. निखिल वर्मा (८), नितीन वर्मा (६) अशी या बेपत्ता झालेल्या मुलांची नावे आहेत. या दोन्ही मुलांचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

याप्रकरणी लक्ष्मी राजकुमार वर्मा (वय ३०) यांनी देहू रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लक्ष्मी या विठ्ठलवाडी येथे भाड्याच्या खोलीत राहतात. त्या मजुरीचे काम करत होत्या. शनिवारी (दि. ६) नेहमीप्रमाणे मुलांना घरी सोडून सकाळी ९ वाजता कामावर गेल्या होत्या. मात्र, सायंकाळी सहा वाजता कामावरून घरी आल्यानंतर दोन्ही मुले घरी नव्हती. त्यानंतर त्यांनी शेजारी व नातेवाईकांकडे त्यांची चौकशी केली मात्र ते कुठेच सापडले नाहीत. अखेर लक्ष्मी यांनी पोलिसांत धाव घेतली.

यातील निखिल वर्माची उंची ४.५ फूट, पातळ बांधा, गोरा रंग, बारीक काळे केस, पिवळ्या रंगाचा चौकडी शर्ट घातलेला जॉय नेस्ट स्कूल बॅच, पायात लाल सँडल असलेली निळी फुलांची पॅन्ट आहे. तर नितीन वर्माची उंची ४ फूट, पातळ बांधा, गोरा रंग, छान केस, पांढरा टी-शर्ट, काळी हाफ पँट, निळी चप्पल घातलेली आहे. ही दोन्ही मुले कोणाला सापडल्यास 02027671188, 9823586190, 9422939077 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन देहूरोड पोलिसांनी केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest