Pimpri chinchwad : अमोल कोल्हेंच्या नाटकाचे मोफत पासेस मागणारा पोलिस कर्मचारी निलंबित

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या पिंपरी चिंचवडमधील नाटकाच्या पासेस मोफत मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मोफत पासेस द्या, अन्यथा नाटक बंद करू, अशी धमकी पोलीस कर्मचाऱ्याने दिली होती.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 15 May 2023
  • 05:07 pm
अमोल कोल्हेंच्या नाटकाचे मोफत पासेस मागणारा पोलिस कर्मचारी निलंबित

अमोल कोल्हेंच्या नाटकाचे मोफत पासेस मागणारा पोलिस कर्मचारी निलंबित

पिंपरी चिंचवडचे आयुक्त विनयकुमार चौबे यांची कारवाई

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या पिंपरी चिंचवडमधील नाटकाच्या पासेस मोफत मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मोफत पासेस द्या, अन्यथा नाटक बंद करू, अशी धमकी पोलीस कर्मचाऱ्याने दिली होती.

पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर नाटक होणार होते. या नाटकाचे एका पोलीस कर्मचाऱ्याने पासेस मोफत मागितले होते. पासेस नाही दिल्यास नाटक बंद पाडू, अशी धमकीही त्यांनी दिली होती. या प्रकरणी पिंपरी चिंचवडचे पोलीस आय़ुक्त विनयकुमार चौंबे यांनी या पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. हा अनुभव अमोल कोल्हे यांनी ट्वीटरवरून एक व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केला आहे.

अमोल कोल्हे म्हणाले की,मी पोलिस विभागाच्या किंवा व्यक्तीच्या विरोधात नाही, पण मोफत पास मागण्याच्या मानसिकतेच्या विरोधात आहे. एका पोलिसाने मोफत पासेस मागितले आणि त्याची मागणी पूर्ण न केल्याबद्दल नाटक थांबवण्याची धमकी दिली. मी या पोलीस बांधवाचे नाव जाणीवपुर्वक सांगणार नाही. कारण विरोध व्यक्तीला नाही तर प्रवृत्तीला आहे. ही मोफत पास मागण्याची प्रवृत्ती आहे, याला माझा विरोध आहे.

छत्रपती संभाजीनगर, नाशिक, निपाणी आणि कराडमध्ये या नाटकाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नाशिकमध्ये पोलिस आयुक्तांसह २,५०० पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी तिकिटे खरेदी केली, परंतु पिंपरी चिंचवड पोलिसांबाबतचा माझा अनुभव खूपच वाईट होता. माझा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावे, असेही अमोल कोल्हे यावेळी बोलताना म्हणाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest