पिंपरी-चिंचवड : सेक्टर १२ गृह प्रकल्पातील पाण्याचा प्रश्न सुटता सुटेना!

गेल्या चार महिन्यांपासून पाण्याची तक्रार असलेल्या गृह प्रकल्पातील रहिवाशांच्या प्रश्नांवर तोडगा निघू शकलेला नाही. (water problem) पुणे महानगर विकास प्राधिकरण ( पीएमआरडीए) व पिंपरी चिंचवड महापालिका एकमेकांकडे बोट दाखवत असून,

water problem

संग्रहित छायाचित्र

गेल्या चार महिन्यांपासून पाण्याची तक्रार असलेल्या गृह प्रकल्पातील रहिवाशांच्या प्रश्नांवर तोडगा निघू शकलेला नाही. (water problem)  पुणे महानगर विकास प्राधिकरण ( पीएमआरडीए) व पिंपरी चिंचवड महापालिका एकमेकांकडे बोट दाखवत असून, रहिवाशांना आता पुन्हा हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.  (Pimpri Chinchwad)

प्राधिकरणातर्फे भोसरी येथील सेक्टर क्रमांक १२ येथे गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. ५२ हेक्टर क्षेत्रापैकी ९.४३ हेक्टर क्षेत्रावर प्रकल्प साकारत आहे. या प्रकल्पामध्ये ११ मजल्याच्या एकूण ४५ इमारती आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठीचा हा गृहप्रकल्प आहे. दुसरा टप्प्यातील कामदेखील आता सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे उरलेल्या घरांची विक्रीसाठी पुन्हा जाहिरात काढण्यात येणार आहे. 

दरम्यान, या प्रकल्पातील क्लस्टर ए १,ए २ आणि ए ३ या इमारतीत पाण्याअभावी नागरिकांना दिवस काढावा लागतो. केवळ पिण्यासाठीच नव्हे तर, वापरासाठीही विकतचे पाणी घेण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे. हा प्रश्न सुटावा यासाठी ६०-७० रहिवाशी प्राधिकरणावर धडकले होते. मात्र, सर्वांना आश्वासन देऊन पुन्हा पाठवण्यात आले. त्यानंतर पाहणी करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले

प्राधिकरणाच्या स्थापत्य विभागाकडून सांगण्यात आले की, या परिसरात महापालिका पाणीपुरवठा करते. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. तसेच, महापालिकेकडूनच पुढील पाण्याचे नियोजन करता येईल. क क्षेत्रीय पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले की, आम्ही केवळ पाणी पुरवठ्याचे नियोजन करतो. सेक्टर १२ मध्ये काही भागात चढ असल्याने पाणी तेथपर्यंत पोहोचत नाही. या भागात मागणीनुसार जवळपास ८० ते ८५ टक्के पाणीपुरवठा होतो. सध्या उन्हाळादेखील आहे. त्यामुळे प्राधिकरणाने त्यावर तोडगा काढावा. 

पाण्याच्या प्रश्नाबाबत पीएमआरडीएकडून आम्हाला कळवण्यात आले आहे. जलवाहिनीमध्ये काही अडकले असल्याची शक्यता आहे. ते पाहण्यासाठी सांगितले आहे. तरीसुद्धा पाणी आले नाही तर पुढील निर्णय घेण्यात येईल.

— रामनाथ टकले, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest