पिंपरी चिंचवड: आणखी दोन इंग्रजी शाळा महापालिका सुरू करणार

महापालिकेच्या चिंचवड दळवीनगर आणि भोसरी या ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू आहेत. या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांचा प्रतिसाद चांगला आहे. त्यामुळे शहरात आणखी दोन शाळा इंग्रजी माध्यमाच्या करण्याचा निर्णय महापालिकेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे.

संग्रहित छायाचित्र

सध्याच्या दोन इंग्रजी शाळांत ११०० विद्यार्थी घेताहेत शिक्षण

महापालिकेच्या चिंचवड दळवीनगर आणि भोसरी या ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू आहेत. या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांचा प्रतिसाद चांगला आहे. त्यामुळे शहरात आणखी दोन शाळा इंग्रजी माध्यमाच्या करण्याचा निर्णय महापालिकेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे.

महापालिकेच्या शिक्षण मंडळाने २०१५ मध्ये खासगी संस्थांच्या मदतीने बोपखेल आणि मोशी येथे इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. मात्र, पुढे त्याला यश आले नाही. नंतर महापालिकेने  भोसरी व चिंचवड येथील दळवीनगरमध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली आहे. अवघ्या ६४ विद्यार्थी संख्येवर सुरू झालेल्या या शाळेमध्ये आता ११०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश न घेता अनेक पालक महापालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी उत्सुक आहेत. पालकांचा चांगला प्रतिसाद असताना जागा कमी असल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश देता येत नाही.

त्यामुळे आणखी दोन ठिकाणी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी कोणती शाळा निवडायची याबाबत विचार सुरू आहे. जून महिन्यापासून आणखी दोन शाळा इंग्रजी माध्यमाच्या केल्या जाणार आहेत.

‘‘इंग्रजी शाळेत प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल आहे. त्यासाठी त्यांना शाळा उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील दोन शाळांमध्ये इंग्रजी माध्यम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी कोणत्या शाळा निवडायच्या याबाबत आयुक्त निर्णय घेणार आहेत. मात्र, त्यासाठी कार्यवाही सुरू झाली आहे.’’

- विजयकुमार थोरात, सहायक आयुक्त, शिक्षण विभाग

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest