Pimpri-Chinchwad: ठाकरे-चव्हाणांच्या सभेसाठी कष्टकऱ्यांच्या पोटावर पाय!

महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेसाठी मैदानाच्या आसपास गेल्या अनेक वर्षांपासून प्रामणिकपणे कष्ट करून व्यवसाय करणाऱ्या पथारीधारकांना हाकलून देण्यात आले. यामुळे पथारी व्यावसायिकांच्या रोजगारावर विपरीत परिणाम झाला.

सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानाचा परिसर दररोज सांयकाळी खाद्यपदार्थ विकणाऱ्या हातगाड्या आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या गर्दीने गजबजलेले असताे. महाविकास आघाडीच्या प्रचार सभेसाठी बुधवारी या हातगाडीधारकांना हटविल्यामुळे हा परिसर असा ओकाबोका दिसत होता.

महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरेंच्या प्रचार सभेआधी कष्टकऱ्यांना हाकलले

महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेसाठी मैदानाच्या आसपास गेल्या अनेक वर्षांपासून प्रामणिकपणे कष्ट करून व्यवसाय करणाऱ्या पथारीधारकांना हाकलून देण्यात आले. यामुळे पथारी व्यावसायिकांच्या रोजगारावर विपरीत परिणाम झाला.

माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार सुप्रिया सुळे यांच्या संयुक्त सभेचे बुधवारी (८ मे) सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर आयोजन करण्यात आले होते. मात्र, सभेसाठी मैदानाच्या कडेला गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या सुमारे ५० हून अधिक पथारी धारकांना आपला व्यवसाय बंद ठेवण्यास भाग पाडले गेले.एका पथारीवर किमान आठ ते दहाजणांचे कुटुंब चालत असून गेल्या अनेक वर्षांपासून खाऊ गल्ली म्हणून हा परिसर प्रसिद्ध आहे. जुनी सांगवी, नवी सांगवी , पिंपळे गुरव आदी भागातील नागरिक या ठिकाणी दररोज विविध पदार्थ खाण्यासाठी, खरेदी करण्यासाठी येत असतात. मात्र, केवळ महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी या व्यावसायिकांना उन्हाळ्याची सुट्टी सुरू असताना आपला व्यवसाय बंद ठेवावा लागल्याने या पथारी व्यवसायिकांसह ग्राहकांमध्ये  देखील नाराजी पसरली होती. शाळा-महाविद्यालयाला सुट्ट्या लागल्याने अनेक पालक आपल्याला परवडेल असे खाद्यपदार्थ घेण्यासाठी बुधवारीदेखील या ठिकाणी आले होते. मात्र, सभा असल्याने येथील खाऊ गल्ली बंद असल्याचे त्यांना समजल्यामुळे लहान मुलांचा आणि त्यांचाही हिरमोड झाला. माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वराज चव्हाण, खासदार सुप्रिया सुळे, आपचे खासदार संजय सिंह, आमदार सचिन अहिर आदींनी यावेळी उपस्थितांना संबोधित केले. बारामती लोकसभा मतदारसंघात यापूर्वी गल्लीच्छ राजकारण कधी झाले नव्हते. पण ते यावेळी झाले. त्यामुळे आपण सतर्क रहा. मोबाईल चांगले माध्यम आहे. चुकीच्या गोष्टींचे लगेच व्हिडिओ काढा आणि तक्रारी करा असे आवाहन यावेळी सुळे यांनी केले.

माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, आपण योग्य निर्णय घेतला नाही तर या देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान पुसले जाईल. या औद्योगिक नगरीची सुरुवात आणि पाया रचला गेला तो काँग्रेसच्या काळात. अनेकांना रोजगार दिले आणि आता बेरोजगारी पसरली. आज देश चालवायला मोदींकडे पैसे नसल्याने देश कर्जबाजारी झाला आहे. सरकारी उद्योग विक्री करायची सुरुवात झाली आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात सर्वात पहिली उमेदवारी संजोग वाघेरे यांची जाहीर केली. आता प्रचार करायची गरज आहे असे मला वाटत नाही. बाप बदलण्याची गरज मला नाही. तुम्हाला आहे. लोक तुम्हाला दारात उभे नाही करणार. या निवडणुकीत मुद्दे राहिलेले नाहीत. मोदींनी मागील १० वर्षात मुद्दे ठरविले. पण आता मुद्दे राहिले नाहीत. कारण लोकांनी ठरवून टाकले आहे. 

यांना पराभवाची भीती वाटत आल्याने आता हे राम राम करायला लागले आहेत. रोड शो करत आहेत. आम्ही यांना निकलापूर्वीच रस्त्यावर आणले आहे. तुम्हाला मुंबईत रोड शो करावा लागत आहे. अचानक टीव्हीवर आले आणि नोटबंदी केली. लोकांना त्यांच्या खिशातील पैसे केवळ पांढरे केले. तसेच ४ जून ला केवळ मोदी राहणार आहात. तुमची नाणेबंदी आम्ही करणार आहोत. नोटबंदी हे काळा पैसे पांढरा करण्याचा उद्योग होता.

ठाकरे पुढे म्हणाले, मी यांना मोदी सरकार नाही तर गजनी सरकार म्हणतो. कारण यांना काल काय बोललो हे आठवत नाही. लोकांच्या खात्यात पैसे नाही. पण यांच्या खात्यात लाखो कोटी रुपये आले. निवडणूक रोखे माध्यमातून जगातील सर्वात मोठा घोटाळा केला. लोकांना रोजगार देणार म्हणाला होतात. पण कंत्राटी नोकरी देत आहात. कामाची शाश्वती काय. अग्निवीर ४ वर्षांसाठी आणि तुम्ही १० वर्षानंतरही पुन्हा पाच वर्ष मागत आहात. तुमचे कंत्राट आता संपवावे लागणार आहे. आम्ही तुम्हाला ४ जून ला कंत्राट मुक्त करत आहोत. ज्या मानसिकतेने तुकारामांची गाथा बुडविली. 

त्याच गोमूत्र मानसिकतेने हे आता महामानवाचे संविधान बुडवायला निघाले आहेत. जे आम्हाला नकली शिवसेना म्हणतात, ते बेअकली आहेत. भाजपला राजकारणात मुलं होत नाहीत. आमची मुलं चोरली. आमचा बाप चोरला. म्हणून मी यांना भाकड म्हणतो. माझी जनता, माझे निवडणूक रोखे आहेत. मोदी आज अदानी अंबानीवर बोलायला लागले. मग त्यांना दिलेले व्यवसाय काढून घेणार का? करा मग त्यांचे कंत्राट, मग त्यांच्यावर बोला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest