Pimpri Chinchwad: चिखली जाधववाडी येथील गोदामाला भीषण आग

चिखली जाधववाडी येथील भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असून कुलिंगचे काम सुरू आहे.

चिखली जाधववाडी येथील गोदामाला भीषण आग

चिखली जाधववाडी येथील भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असून कुलिंगचे काम सुरू आहे. 

चिखली, जाधववाडी येथे विविध मालाचा साठा असलेली गोदामे आहेत. काल मध्यरात्रीनंतर तीन वाजण्याच्या सुमारास गोदामाला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर पुणे, पीएमआरडीए, एमआयडीसी, पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाची वाहने तिथे तातडीने पोहचली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार  सद्यस्थितीत कुलिंगचे काम सुरू असल्याचे समजते आहे.  (Pimpri Chinchwad Fire News)

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest