Arrested : गांजा आणि मेफेनटरमाईन औषधी विकणाऱ्याला अटक, ४३ हजाराचा मुद्देमाल जप्त

गांजा आणि मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शन औषधांची विक्री करणाऱ्याला पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल ४३ हजार ५१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 19 May 2023
  • 12:49 pm
गांजा आणि मेफेनटरमाईन औषधी विकणाऱ्याला अटक

गांजा आणि मेफेनटरमाईन औषधी विकणाऱ्याला अटक

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई

गांजा आणि मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शन औषधांची विक्री करणाऱ्याला पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल ४३ हजार ५१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने केली आहे.

रवि चंद्रकांत थापा (वय ३२, रा. सर्व्हे नं. १०३, नेहरुनगर, अॅटलॉस कॉलनी जवळ, पिंपरी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील वायसीएम रुग्णालयाच्या परिसरात खंडणी विरोधी पथकाचे पोलीस कर्मचारी गस्त घातल होते. यावेळी एक इसम हातामध्ये एक सफेद रंगाची पिशवी घेवुन संशयीतरित्या थांबलेला दिसला. त्यानंतर पोलीसांना पाहताच तो पळून जात होता. यावेळी पोलीसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

पोलीसांनी रविला ताब्यात घेवून हातात असलेल्या सफेद रंगाचे पिशवीमध्ये काय आहे? सरकारी गाडी पाहुन गडबडीत का पळुन जात होता? असे विचारले. यावर त्याने पिशवीमध्ये गांजा आणि मेफेनटरमाईन इंजेक्शन असल्याचे सांगीतले. त्यानंतर पोलीसांनी रविला अटक करून त्याच्याकडे असलेल्या पिशवीमध्ये १६ हजार ०५० रुपये किंमतीचा ६४२ ग्रॅम वजनाचा गांजा, २५ हजार ४६० रुपये किंमतीच्या मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शन औषधांच्या ९५ पॅकबंद बाटल्या आणि रोख २ हजार रुपये असा एकुण ४३ हजार ५१० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. तसेच त्याच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात कलम २७६, ३३६,३२८ व एन. डी. पी. एस. ॲक्ट कलम ८(क), २०(ब) (ii) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉक्टारांच्या सल्ल्यानुसारच औषधी घ्या, पोलीसांचे आव्हान

मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शन आयपी हे औषध जास्त करून कॉलेजची मुले जिममध्ये जास्त वेळ व्यायाम व्हावा व शरीर चांगले दिसावे तसेच सेक्स पावर वाढावी यासाठी करतात अशी माहिती मिळाली आहे. परंतु सदरचे औषध घेण्याचे दुरगामी परिनाम होतात असे औषध निरीक्षक यांचे मत आहे. त्यामुळे असे औषध डॉक्टरच्या प्रिस्क्रीपशन शिवाय घेवू नये असे अहवान पोलीसांकडून करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest