चिखली : जलतरण तलावात तरुणाचा बुडून मृत्यू, गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवडमधील चिखली येथील जलतरण तलावात बुडून २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना चिखलीतील साईॲक्वा मरीन जलतरण तलावात मंगळवारी (दि. १६) सायंकाळी ४ च्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Wed, 17 May 2023
  • 12:20 pm
जलतरण तलावात तरुणाचा बुडून मृत्यू, गुन्हा दाखल

जलतरण तलावात तरुणाचा बुडून मृत्यू, गुन्हा दाखल

तरुणाच्या चुलत भावाने दिली चिखली पोलीसांत फिर्याद

पिंपरी चिंचवडमधील चिखली येथील जलतरण तलावात बुडून २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना चिखलीतील साईॲक्वा मरीन जलतरण तलावात मंगळवारी (दि. १६) सायंकाळी ४ च्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल वाघमोडे (वय १७) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी राहुलचा चुलत भाऊ सुरज मलिक्काअर्जुन वाघमोडे (वय २९, धंदा व्यवसाय रातथास्तु पॅराडाईज, कंद पाटील नगर देहुरोड) याने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल मंगळवारी सायंकाळी ४ च्या सुमारास चिखलीतील साईॲक्वा मरीन जलतरण तलावात पोहण्यासाठी गेला होता. मात्र, पाण्याचा अंदाज न लागल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी राहुलचा चुलत भाऊ सुरजने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत सुरजने तलावावर नियंत्रण ठेवनाऱ्या इतर जबाबदार व्यक्तीच्या हलगर्जीपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे राहुलचा जीव गेला असे म्हटले असून संबंधित प्रशासनाला जबाबदार धरले आहे. त्यानुसार पोलीसांनी कलम ३०४ (अ), ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या चिखली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest