नाट्यसंमेलनातही अजित पवारांचा 'नाही मी भेटत' चा अंक

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यापासून काका शरद पवार यांच्यासमोर यायचेच नाही, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. शंभराव्या पिंपरी-चिंचवड नाट्यसंमेलनातही शरद पवार यांच्यासमोर जाण्याचे अजित पवार यांनी टाळले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यक्रमास उपस्थित असतानाही नाट्यसंमेलन स्थळापासून दहा ते पंधरा किलोमीटर म्हणजे २० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या कार्यक्रमास अजित पवार गेले नाहीत.

पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या शंभराव्या मराठी नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार

शरद पवारांच्या हजेरीमुळे संमेलनस्थळ जवळ असूनही अजित पवारांनी मारली दांडी

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यापासून काका शरद पवार यांच्यासमोर यायचेच नाही, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. शंभराव्या पिंपरी-चिंचवड नाट्यसंमेलनातही शरद पवार यांच्यासमोर जाण्याचे अजित पवार यांनी टाळले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यक्रमास उपस्थित असतानाही नाट्यसंमेलन स्थळापासून दहा ते पंधरा किलोमीटर म्हणजे २० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या कार्यक्रमास अजित पवार गेले नाहीत.
 
अजित पवार चाळीसहून अधिक आमदारांसह शरद पवार यांच्यापासून फुटून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील झाले. तेव्हापासून दोघांमध्ये शितयुध्द सुरू आहे. सुरुवातीला दोघांनी एकमेकांविरुध्द थेट टीका टाळली होती. मात्र, सूचक बोलण्यातून एकमेकांना इशारे देत आहेत. मात्र, या सगळ्या काळात शरद पवार यांच्यासमोर जाणे मात्र अजित पवार यांनी टाळले आहे.

पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या शंभराव्या मराठी नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आहेत. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नाट्यसंमेलनाचे उद‌्घाटन झाले. दुपारी साडेबारा ते अडीचपर्यंत शरद पवार या ठिकाणी होते. यावेळी अजित पवार तेथे आले नाहीत.

२ जुलै २०२३ रोजी अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडून नऊ मंत्र्यांसह उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासून दोघांनी एकत्र कार्यक्रम टाळले आहे.  दोघांनी दोन कार्यक्रमांना एकत्रितपणे हजेरी लावली आहे. मात्र, या कार्यक्रमांमध्येही अजित पवारांनी शरद पवार यांच्यासमोर जाणे टाळले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक ऑगस्ट २०२३ रोजी लोकमान्य टिळक सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे शरद पवार होते. राजशिष्टाचार म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपस्थित राहणे आवश्यक होते. त्याप्रमाणे ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधानांच्या अगोदर येऊन शरद पवार एकटेच व्यासपीठावर बसले होते.  शरद पवार या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन होण्यापूर्वी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे व्यासपीठाकडे आले. मात्र त्यांनी शरद पवार यांची भेट टाळण्यासाठी मार्ग बदलला. शरद पवारांच्या पाठीमागून जात आपल्या आसनावर जाऊन बसले. यावेळी शरद पवारांचे मात्र अजित पवारांकडे लक्ष नव्हते. ते समोरून आलेल्या राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांना हस्तांदोलन करत होते.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही राज्यातील सहकार क्षेत्रातील मोठी संस्था समजली जाते. आजपर्यंत प्रत्येक बैठकीला शरद पवार यांच्यासोबत अजित पवार उपस्थित राहात आले आहेत. मात्र, यंदाच्या वर्षी १५ सप्टेंबरला झालेल्या बैठकीला अजित पवारांनी दांडी मारली होती. दौंडच्या रस्त्यावर असलेल्या मांजरी येथे न थांबता ते खासगी कामासाठी म्हणून त्याच दिवशी दौंडला गेले होते. अजित पवार यांचे वडील अनंतराव पवार यांच्या नावाने उभारलेल्या दौंड येथील शाळेच्या नवीन वास्तूच्या कार्यक्रमातही दोघे एकत्र येणे स्वाभाविक होते. २२ ऑक्टोबर रोजी झालेल्या या कार्यक्रमात दोघे व्यासपीठावर एकत्र आले.  शरद पवार यांच्याशेजारीच अजित पवारांची खुर्ची होती. त्यांच्या नावाची पाटीही लावली होती. मात्र, त्यांनी ही पाटी काढली आणि शरद पवार यांच्यापासून दोन खुर्च्या सोडून बसले.  जाहीर कार्यक्रमात एकत्र आले नाहीत तरी एकदा मात्र अजित पवार यांनी शरद पवार यांची गुप्त भेट घेतली होती. उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या पुण्यातील निवासस्थानी ही गुप्त भेट झालेली होती.

दरम्यान, मोशी येथे पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे नाट्यसंमेलनाला उपस्थित राहता आले नाही. मात्र, संयोजक भाऊसाहेब भोईर यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांना सर्व प्रकारची मदत केली आहे.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest