मोशी घनकचरा प्रकल्पाची पाहणी

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे व शहर अभियंता शिरिष आरदवाड यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनांतर्गत मोशी येथे कार्यान्वित असलेल्या विविध प्रकल्पांना नुकतीच भेट दिली. दरम्यान वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, हॉटेल वेस्ट टू बायोगॅस, राडारोडा व्यवस्थापन केंद्राच्या तांत्रिक बाबींसह प्रकल्प उभारताना येणाऱ्या आव्हानांबाबत त्यांनी पिंपरी-चिंचवड पालिका आयुक्तांकडून माहिती घेतली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 25 Nov 2024
  • 01:50 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

मोशी घनकचरा प्रकल्पाची पाहणी

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे व शहर अभियंता शिरिष आरदवाड यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनांतर्गत मोशी येथे कार्यान्वित असलेल्या विविध प्रकल्पांना नुकतीच भेट दिली. दरम्यान वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, हॉटेल वेस्ट टू बायोगॅस, राडारोडा व्यवस्थापन केंद्राच्या तांत्रिक बाबींसह प्रकल्प उभारताना येणाऱ्या आव्हानांबाबत त्यांनी पिंपरी-चिंचवड पालिका आयुक्तांकडून माहिती घेतली.

पिंपरी-चिंचवड शहरात निर्माण होणाऱ्या एकुण घनकचऱ्यावर तसेच बांधकाम राडारोड्यावर मनपा मार्फत करण्यात येणाऱ्या संकलन व प्रक्रियेबाबत  पिंपरी- चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी उपस्थितांना सादरीकरणासह विस्तृत माहिती दिली.  प्रकल्प यशस्वीरित्या उभारुन कार्यान्वित केल्याबद्दल नवी मुंबईच्या पालिका आयुक्तांनी पिंपरी-चिंचवड मनपाचे अभिनंदन केले. तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमार्फत शहरात निर्माण होणाऱ्या सर्व प्रकारच्या घनकचऱ्यावर करण्यात येणाऱ्या शाश्वत व पर्यावरणपुरक प्रक्रियेबाबत संपूर्ण माहिती घेतली, त्यानुसार सदरचे प्रकल्प पर्यावरणपुरक व स्टेट ऑफ दि आर्ट संकल्पनेवर आधारित असून सर्व आव्हानांचा सामना करुन पूर्ण केल्याबद्दल कौतुक केले. यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेचे शहर अभियंता शिरिष आरदवाड, कार्यकारी अभियंता राजेश पवार, उप-अभियंता जितेंद्र रावळ तसेच पिंपरी-चिंचवड मनपाचे उप अभियंता योगेश आल्हाट उपस्थित होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest