पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांत तब्‍बल ११ हजार मतदारांचे ‘नोटा’ला मतदान

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांतील मतदारांनी यंदा ‘नोटा’ला अधिक मते दिली आहेत. तीनही मतदारसंघांतून एकूण ११ हजार पाच मते ‘नोटा’ला पडली आहेत. चिंचवडमध्ये ‘नोटा’च्‍या अधिकाराचा अधिक वापर झाला आहे. त्‍या खालोखाल पिंपरी आणि भोसरीतील मतदारांनी नोटाला पसंती दिल्‍याचे चित्र आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 25 Nov 2024
  • 01:43 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पिंपरी, चिंचवड आणि भोसरीतील उमेदवार मतदारांना नव्हते पसंत

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांतील मतदारांनी यंदा ‘नोटा’ला अधिक मते दिली आहेत. तीनही मतदारसंघांतून एकूण ११ हजार पाच मते ‘नोटा’ला पडली आहेत. चिंचवडमध्ये ‘नोटा’च्‍या अधिकाराचा अधिक वापर झाला आहे. त्‍या खालोखाल पिंपरी आणि भोसरीतील मतदारांनी नोटाला पसंती दिल्‍याचे चित्र आहे.

निवडणूक आयोगाने  मतदानासाठी १९९० पासून ईव्हीएम मशीनचा वापर सुरू झाला. त्यापूर्वी बॅलेट पेपरवर मतदान होत असे. ईव्हीएमवर २०११ मध्ये नोटाचा वापर सुरू झाला. यापूर्वी नोटा अस्तित्वात नव्हता. उमेदवारांची नावे आणि त्यांच्या चिन्हानंतर सर्वात शेवटी यापैकी कुणीच नाही म्हणजे नोटा या पर्यायाचा वापर सुरू झाला. एखाद्या मतदाराला कोणता ही उमेदवार पसंत नसेल; तर मतदारांना ईव्हीएम मशिनवर ‘नोटा’ हा अधिकार वापरायची परवानगी असते. मात्र, त्‍याचा वापर झाल्‍याने अनेक उमेदवारांना तोटा होत आहे. ‘नोटा’चा वापर करणारे मतदारही वाढत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील मतदारांनीही यंदा मोठ्या प्रमाणात ‘नोटा’चा वापर केला आहे.

चिंचवड विधानसभेत ४ हजार ३१६ मते ‘नोटा’ला पडली. तीन मतदारसंघांपैकी चिंचवडला अधिक मते पडली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर पिंपरी विधानसभेतील मतदारांनी ‘नोटा’ या अधिकाराचा वापर केला आहे. पिंपरीतून ४ हजार १३ मते ‘नोटा’ला पडली आहे. तर भोसरी विधानसभेत २ हजार ६७६ मते ‘नोटा’साठी पडली आहेत. तीनही विधानसभा मतदारसंघांत एकूण तब्‍बल ११ हजार पाच मतांची ‘नोटा’ म्हणून नोंद झाली.

अद्याप फेरनिवडणूक नाही

लोकसभा निवडणुकीत तीन ते पाच टक्क्यांपर्यंत नोटाला मतदान झालेले आहे. ईव्हीएम मशीनवर दर्शवलेल्या २०११ मध्ये उमेदवारांपैकी कोणालाही मत द्यायचे नसेल तर, वरीलपैकी कोणीही नाही म्हणजे नोटा हा पर्याय निवडणे मतदारांना शक्य झाले. संख्या ही अधिक असेल तर, ती निवडणूक रद्द होते. संबंधित मतदारसंघात फेरनिवडणूक घेतली जाते. आतापर्यंत असा प्रसंग उद्भवलेला नाही.

२०१४ मध्येही ११ हजार ९१ मतदान नोटाला

२०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत चारही मतदारसंघात एकूण ११ हजार ९१ मतदान नोटाला झाले होते. त्यामध्ये सर्वांत जास्त पिंपरी मतदारसंघात ४ हजार ४३२ मतदान नोटाला झाले होते. त्याखालोखाल चिंचवड मतदारसंघात ३ हजार २०३ मतदारांनी नोटाला मतदान केले होते. तर भोसरी मतदारसंघात १ हजार ४४७ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला होता. सगळ्यात कमी मावळ मतदारसंघात २ हजार मतदारांनी नोटाला पसंती दिली होती.

२०१९ ला १४ हजार मतदार

२०१९ ला विधानसभा निवडणुकीत चारही मतदारसंघात एकूण १४ हजार २४६ मतदान नोटाला झाले होते. त्यामध्ये सर्वांत जास्त चिंचवड मतदारसंघात ५ हजार ८७४ मतदान नोटाला झाले होते. त्याखालोखाल पिंपरी मतदारसंघात ३ हजार २४६ मतदारांनी नोटाला मतदान केले होते. तर भोसरी मतदारसंघात ३ हजार ६३६ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला होता. सगळ्यात कमी मावळ मतदारसंघात १ हजार ४९० मतदारांनी नोटाला पसंती दिली होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story