हिंजवडीमधील 'ठेका' हॉटेलवर कारवाई

आयटी पार्क हिंजवडीमधील 'ठेका' हॉटेलवर हिंजवडी पोलिसांनी कारवाई केली. हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे हुक्का विक्री केली जात असल्याबाबत रविवारी (७ जुलै) रात्री ११ वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Wed, 10 Jul 2024
  • 11:45 am
pimpri chinchwad news, hinjewadi, theka hotel,  illegal sale of hookah, police took action, PCMC

हिंजवडीमधील 'ठेका' हॉटेलवर कारवाई

आयटी पार्क हिंजवडीमधील 'ठेका' हॉटेलवर हिंजवडी पोलिसांनी कारवाई केली. हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे हुक्का विक्री केली जात असल्याबाबत रविवारी (७ जुलै) रात्री ११ वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

हॉटेल मॅनेजर अरविंदसिंग चमेलसिंग (वय २७, रा. हिंजवडी), हॉटेल मालक वैभव प्रल्हाद वारडे (वय ३५, रा. आकुर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार कैलास केंगले यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या हॉटेलमध्ये हुक्क्याचा वेगळा झोन तयार न करता ग्राहकांना जेवण्यासाठी व हुक्का पिण्यासाठी एकत्र बसवले. ग्राहकांना हुक्का पिण्यासाठी दिला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी कारवाई करत २४ हजार १९८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दोघांवर गुन्हा दाखल केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest