पिंपरी चिचंवड : बीआरटी मार्गावर साचले कचऱ्याचे ढीग

हिंजवडी आयटी पार्क, महामार्ग आणि पुणे शहराला जोडणारा मुख्य रस्ता म्हणून औंध ते किवळे या बीआरटी मार्गकडे पाहिले जाते. तसेच, शहरातील सुरू असलेल्या काही मार्गापैकी हा एक मार्ग विनाअडथळा सुरू आहे. मात्र वाकड फाट्याजवळील बीआरटी मार्गालगत कचऱ्याचे ढीग साचले आहेत.

Garbage, piled up, BRT route,Wakad Phata, Hinjewadi  IT Park, highway ,Pune city, BRT line

औंध ते किवळे मार्गाची स्थिती, सर्वत्र दुर्गंधी, वाढत्या डासांमुळे आरोग्य धोक्यात

हिंजवडी आयटी पार्क, महामार्ग आणि पुणे शहराला जोडणारा मुख्य रस्ता म्हणून औंध ते किवळे या बीआरटी मार्गकडे पाहिले जाते. तसेच, शहरातील सुरू असलेल्या काही मार्गापैकी हा एक मार्ग विनाअडथळा सुरू आहे. मात्र वाकड फाट्याजवळील बीआरटी मार्गालगत कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे, सर्वत्र दुर्गंधी पसरली असून त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. याबाबत महापालिकेने कोणतीही कारवाई केली नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

सफाई कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणी आजूबाजूचा कचरा गोळा करून ठेवला जातो. नंतर, तो घंटागाडीमार्फत इतरत्र हलवला जातो. मात्र, अनेकदा घंटागाडी येत नसल्याने या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे..ओला, सुका कचरा साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

तसेच डासांचे प्रमाणदेखील वाढल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा सर्वाधिक फटका येथील व्यापाऱ्यांना बसत असल्याने त्यांनी पालिकेच्या कारभाराविषयी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. पालिकेच्या थेरगाव क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे तसेच, बीआरटी परिसर नेहमीच स्वच्छ राहील यासाठी ठोस पावले टाकावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

डांगे चौकातील वाकड फाट्याजवळील बीआरटी मार्ग सध्या नागरिकांसाठी डोकेदुखी बनला आहे. दिवसभर परिसरात गर्दुल्ल्यांचा वावर, कचऱ्याचे ढीग, पुलाखालील बेशिस्त पार्किंग, त्याचप्रमाणे हातगाडी चालकांनी अतिक्रमण केल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो.

भूमिगत पुलाखालीही कचरा

काळेवाडी फाटा ते डांगे चौक या रस्त्यावर दोन भूमिगत पूल आहेत. या पुलाखाली रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. यामुळे संपूर्ण रस्ता कचऱ्याने भरतो. परिसरात राहणारे नागरिक आणि व्यावसायिक पहाटे कोणी नसल्याचे पाहून कचरा टाकतात. तसेच, अनेकजण दुचाकीवर येऊन कचरा फेकून निघून जातात.

कचरा वेळोवेळी उचलला जात नाही. त्यामुळे परिसरात कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. यामुळे कुत्र्यांचाही त्रास  वाढला आहे. एकीकडे स्वच्छ परिसराच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे रस्त्यावरती दुर्गंधीचे राज्य अशी परिस्थिती आहे.

- रामलाल चौधरी, व्यावसायिक, (डांगे चौक, थेरगाव)

 

नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकू नये. साचलेला कचरा तत्काळ उचलून साफसफाई करण्याचा सूचना दिल्या आहेत.

- अजिंक्य येळे, सहाय्यक आयुक्त, आरोग्य विभाग

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest