Pimpri-Chinchwad : 'स्पेस ऑन व्हिल्स' शहरात होणार दाखल

पिंपरी-चिंचवड : संपूर्ण देशाचा स्वाभिमान असलेली भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या भेटीला येणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sun, 20 Oct 2024
  • 07:30 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

सायन्स पार्क आणि तारांगण येथे अनुभवता येणार विज्ञान प्रवास

पिंपरी-चिंचवड : संपूर्ण देशाचा स्वाभिमान असलेली भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या भेटीला येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तसेच प्रामुख्याने पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थी आणि विज्ञानप्रेमी नागरिकांना 'स्पेस ऑन व्हिल्स’ या उपक्रमांतर्गत इस्रोच्या आजवरच्या पराक्रमांची रोमांचकारी सफर अनुभवता येणार आहे. १९ ते २० या दोन दिवशी ते उपलब्ध असणार आहे. विज्ञान भारती व पिंपरी-चिंचवड सायन्स पार्कच्या वतीने ही माहिती देण्यात आली.

विज्ञान भारती आणि इस्रो यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्पेस ऑन व्हील्स’ हा विशेष विज्ञान प्रचार उपक्रमाची १७ ऑक्टोबर २०२४ रोजी पुण्यात उत्साहात सुरुवात झाली आहे. १९ व २० ऑक्टोबर शनिवार व रविवारी रोजी 'स्पेस ऑन व्हिल्स’ पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण येथे विज्ञानप्रेमींसाठी सकाळी १० ते सायं. ०६ या वेळेत उपलब्ध असणार आहे. यानंतर ‘स्पेस ऑन व्हिल्स’ रहाटणी येथील एसएनबीपी विद्यालय येथे २१ व २२ ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून अंतराळ विज्ञानाचा प्रचार आणि विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश आहे. विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या समन्वयाने हा उपक्रम राबवला जात आहे. पहिल्या टप्प्यात पुणे, पिंपरी चिंचवड शहरांत ‘स्पेस ऑन व्हिल्स’ हा उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे. भारताच्या विकासामध्ये अवकाश विज्ञानाच्या प्रगतीचा मोठे योगदान आहे. आधुनिक भारताच्या जडण-घडणीत भारतीय अवकाश संशोधन संस्थेने गेल्या सहा दशकांत अनेक अडचणीचे टप्पे पार करून अंतरिक्ष युगात जी झेप घेतली आहे त्यामुळे संपूर्ण मानवजातीला त्यांचे विविध क्षेत्रांत लाभ मिळत आहेत व अशा प्रगतीची झलक इस्रोच्या या प्रदर्शनातून दाखविली जाणार आहे तरी, जास्तीत जास्त विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही आहेत 'स्पेस ऑन व्हिल्स'ची वैशिष्ट्ये

अंतराळ संशोधनाची ओळख: इस्रोच्या यशस्वी मोहिमांचे प्रतिकृती मॉडेल्स आणि संबंधित माहिती.

शैक्षणिक उपक्रम: विद्यार्थ्यांना व्यावहारिक अनुभव देणारे क्रियाकलाप आणि स्पर्धा.

सर्वांसाठी खुला प्रवेश: हा उपक्रम विद्यार्थ्यांसह शिक्षक, विज्ञानप्रेमी आणि नागरिकांसाठी खुला आहे.

कार्यक्रमात सहभागी शाळा आणि संस्थांना प्रशस्तिपत्र प्रदान केली जातील.

प्रदर्शनाच्या आयोजनात साहाय्य करणाऱ्या स्वयंसेवकांना विज्ञान भारती व इस्रोकडून प्रमाणपत्रे दिली जातील.

उपक्रमात नक्की काय?
‘स्पेस ऑन व्हील्स' कार्यक्रमासोबतच, विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय, विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची आणि कल्पकतेची परीक्षा घेण्यासाठी प्रश्नमंजूषा आयोजित केल्या जातील. ह्याचे आयोजन संबंधित संस्थेच्या सहकार्याने होईल.

 

Share this story

Latest