Pimpri-Chinchwad: महापालिकेच्या सीएसआर कक्षाच्या सल्लागाराचे मानधन ६९ लाख

पिंपरी-चिंचवड: महापालिकेच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) कामकाजासाठी कक्षाच्या नेमलेल्या सल्लागाराला तीन वर्षांसाठी महापालिका ६९ लाख रुपये मानधन देणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sun, 20 Oct 2024
  • 07:27 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पिंपरी-चिंचवड: महापालिकेच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) कामकाजासाठी कक्षाच्या नेमलेल्या सल्लागाराला तीन वर्षांसाठी महापालिका ६९ लाख रुपये मानधन देणार आहे. दरमहा एक लाख ७५ हजार रुपये असे ते असणार आहे. दरवर्षी १० टक्के वाढीची तरतूदही त्यात केली आहे.

शहरातील खासगी कंपन्यांच्या सीएसआर निधीतून महापालिकेसाठी निधी आणण्याचे काम सीएसआर कक्षामार्फत केले जाते. ते करण्यासाठी महापालिकेने थेट पद्धतीने सल्लागार नेमले होते. मात्र, त्यात बदल करून आता एजन्सीमार्फत सल्लागार नेमला जात आहे. तीन वर्षांसाठी या कामासाठी सल्लागार नेमण्यासाठी महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने दर मागविले होते. त्यात तीन जणांनी भाग घेतला. पूर्वीपासून काम करत असलेले विजय वावरे यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे. त्यांना दरमहा एक लाख ७५ हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. ही रक्कम कर व्यतिरिक्त आहे. काम समाधानकारक असल्यास मानधनात दरवर्षी १० टक्के वाढ देण्यात येईल. त्यानुसार वर्षाला २१ लाख रुपये आणि तीन वर्षांसाठी ६९ लाख ५१ हजार रुपयांच्या खर्चास आयुक्त शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest