Pimpri-Chinchwad: सफाई कर्मचाऱ्यांना वेतन फरकाची रक्कम

महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना त्याच्या वेतन फरकाची रक्कम दिवाळीपूर्वीच म्हणजे २४ नोव्हेंबरपर्यंत देण्याचे लेखी आश्वासन महापालिका अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी दिले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sun, 20 Oct 2024
  • 03:30 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना त्याच्या वेतन फरकाची रक्कम दिवाळीपूर्वीच म्हणजे २४ नोव्हेंबरपर्यंत देण्याचे लेखी आश्वासन महापालिका अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी दिले.

महापालिकेतील कचरा गोळा करणारे कामगार, वाहनचालक, रस्ते, गटार, नाले सफाई कामगार आणि अतिघाणीत व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कंत्राटी कामगारांना थकीत भविष्य निर्वाह निधी व किमान वेतनातील फरकाची रक्कम देण्यात यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली होती. कामगारांनी महापालिकेच्या दालनाबाहेर आंदोलन केले होते. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे आणि साहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे यांच्यासोबत बैठकही झाली. त्यात महापालिकेने सर्व मागण्या मान्य करत १६ ऑक्टोबरपर्यंत सर्व हिशेब देण्यात येईल आणि २४ ऑक्टोबरपर्यंत कार्यवाही होईल, असे लेखी पत्र दिले. प्रशासनाच्या पत्रानुसार जानेवारी २०११ ते मार्च २०१५ या कालावधीतील भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि त्याच्या फरकाबाबत अ, फ आणि ड कार्यालयाला सूचना दिली आहे. कार्यवाही पूर्तता करून लवकरात लवकर रक्कम देण्यात येईल, असे म्हटले आहे.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest