पवनाथडी जत्रेत महाराष्ट्रीयन पाककलेची मेजवानी

यंदा पवनाथडी जत्रेत शहरवासीयांना शहरी आणि ग्रामीण संस्कृतीचा मिलाप पाहायला मिळत आहे. खाद्यपदार्थांच्या स्टॉल्स बाहेर गर्दी होत असून, चविष्ट अशा शाकाहारी, मांसाहारी पदार्थांवर खवय्ये ताव मारत आहेत. महाराष्ट्रीयन पाककलेचा समृद्ध वारसा या जत्रेतून शहरवासीयांना पाहायला आणि अनुभवाला मिळत आहे.

महाराष्ट्रीयन पाककलेचा समृद्ध वारसा या जत्रेतून शहरवासीयांना पाहायला आणि अनुभवाला मिळत आहे

खवय्यांची शाकाहारी, मांसाहारी स्टॉलवर गर्दी, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, रोजगार प्रशिक्षणासाठी विशेष कक्ष

यंदा पवनाथडी जत्रेत शहरवासीयांना शहरी आणि ग्रामीण संस्कृतीचा मिलाप पाहायला मिळत आहे. खाद्यपदार्थांच्या स्टॉल्स बाहेर गर्दी होत असून, चविष्ट अशा शाकाहारी, मांसाहारी पदार्थांवर खवय्ये ताव मारत आहेत. महाराष्ट्रीयन पाककलेचा समृद्ध वारसा या जत्रेतून शहरवासीयांना पाहायला आणि अनुभवाला मिळत आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, बचत गटाच्या महिलांना रोजगार आणि शहरवासीयांना सर्व समावेशक मेजवानी असे पवनाथडी जत्रेचे स्वरूप आहे.
 
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे ११ ते १५ जानेवारीदरम्यान सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर पवनाथडी जत्रा भरविण्यात आली आहे. या पाच दिवसीय जत्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी जत्रेचा आनंद घेण्यासाठी लोकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यंदाच्या जत्रेमध्ये प्रवेशद्वारापासूनच वैविध्यपूर्ण सजावट, तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या रोषणाईने नागरिकांना आकर्षित केले आहे. हुरड्यासह विविध शुद्ध शाकाहारी, तसेच चमचमीत मांसाहारी खाद्यपदार्थांच्या मेजवानीवर खवय्ये ताव मारताना दिसत आहेत.

 
नेत्रदीपक विद्युत रोषणाई, रचनात्मक स्टॉल्सच्या रांगा, पारंपरिक बैलगाडी शेती साहित्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून सेल्फी काढण्यासाठी या ठिकाणी लोकांची गर्दी होत आहे. जत्रेमध्ये स्त्रियांसाठी कॉस्मेटिक्स, बॅग, साड्या, भांडी तर लहान मुलांसाठी खेळणी, पुस्तकं, कार्टूनच्या बाहुल्या आदी असंख्य स्टॉल्स उपलब्ध आहेत. इतकंच नाही तर वेगवेगळी लोणची, पापड, कुरड्या, डाळी अशा घरगुती पदार्थांची खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी वाढताना दिसत आहे. पुरुषांसाठी चप्पल-बूट, खादीचे कपडे, कुर्ते इत्यादी साहित्याचे स्टॉल्स आहेत.

सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

जत्रेच्या ठिकाणी पालिकेतर्फे महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. येथे ऑर्केस्ट्रा, नाटक, लावणी, गोंधळ, सनई चौघडा, वाघ्या-मुरळींची जुगलबंदी अशा अनेक लोककलांचे, तसेच सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जात आहेत. विविध भागातील पारंपरिक कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळीम्युझिक मेकर्सहा सुमधूर गीतांचा बहारदार कार्यक्रम पार पडला. ज्यामुळे उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. त्यानंतरखेळ रंगला पैठणीचा- होम मिनिस्टरया कार्यक्रमात अनेक महिलांनी सहभाग घेतला.

जत्रेमध्ये लहान मुलांसोबत तरुण, ज्येष्ठ नागरिकही आकाशी पाळणा, ड्रॅगन ट्रेन, झिग झॅग रोलर अशा थरारक खेळांचा अनुभव घेताना दिसत आहेत. जत्रेच्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी लोकांची बैठक व्यवस्था असलेले सांस्कृतिक दालन उभारले आहे. तेथे ऑर्केस्ट्रा, नाटक, लावणी, गोंधळ, सनई चौघडा, वाघ्या-मुरळींची जुगलबंदी अशा अनेक लोककलांचे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून विविध भागातील पारंपरिक कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे.

दरम्यान, दिव्यांग, तृतीयपंथीयांच्या सामाजिक आर्थिक समावेशनासाठी महापालिकेकडून प्रयत्न करण्यात येत असून त्यांच्यासाठीही स्टॉल्स राखीव ठेवले आहेत. त्यांच्याद्वारेही येथे विविध वस्तू, खाद्यपदार्थांची विक्री करण्यात येत आहे

रोजगार, प्रशिक्षणासाठी माहिती कक्ष

यासोबतच १८ ते ३० वयोगटातील युवक, युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, तसेच त्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी महापालिका राबवित असलेल्या लाईट हाऊस उपक्रमात तरुणांनी सहभागी व्हावे, त्याची माहिती घ्यावी यासाठी माहिती कक्ष उभारण्यात आला आहे. या स्टॉललाही तरुणांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचेही उपायुक्त अजय चारठाणकर यांनी सांगितले.

 

पवनाथडी जत्रेच्या ठिकाणी कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेचे कर्मचारी, कायदा सुव्यवस्थेसाठी सुरक्षा कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कर्मचारी आणि पोलीस दलाच्या जवानांसह आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास अग्निशमन बंब, सुसज्ज रुग्णवाहिका तैनात करण्यात आली असल्याची माहिती समाज विकास विभागाचे उपआयुक्त अजय चारठाणकर यांनी दिली आहे.  

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest