यूट्यूबर देतोय बांगलादेशींना घुसखोरीचे प्रशिक्षण

भारतात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असल्याचा मुद्दा अनेकदा समोर आला आहे. मुंबईसह देशभरात अनेक ठिकाणी ते निर्धास्तपणे कोणत्याही वैध कागदपत्रांविना राहात आहेत. हे बांगलादेशी नेमके भारतात कोणत्या मार्गाने घुसतात हा नेहमीच चिंतेचा आणि चर्चेचा विषय राहिला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 29 Jul 2024
  • 11:12 am
world news, Bangladeshi citizens living illegally, Bangladeshis enter India, infiltration training, YouTubers

संग्रहित छायाचित्र

भारतात बेकायदेशीरपणे कसे घुसायचे? व्हीडीओत दाखवले बीएसएफचे टनेल, सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस

ढाका: भारतात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असल्याचा मुद्दा अनेकदा समोर आला आहे. मुंबईसह देशभरात अनेक ठिकाणी ते निर्धास्तपणे कोणत्याही वैध कागदपत्रांविना राहात आहेत. हे बांगलादेशी नेमके भारतात कोणत्या मार्गाने घुसतात हा नेहमीच चिंतेचा आणि चर्चेचा विषय राहिला आहे. या दरम्यान एका बांगलादेशी यूट्यूबरने याच विषयावर तयार केलेला एक जुना व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या  व्हीडीओत तो चक्क भारतात बेकायदेशीरपणे कसे घुसायचे याची माहिती देत आहे. 'डीएच ट्रॅव्हलिंग इन्फो'  असे त्याच्या अकाऊंटचे नाव आहे. व्हीडीओत तो भारतात जाण्यासाठी कोणताही व्हिसा, पासपोर्ट किंवा कागदपत्रांची गरज नसल्याचे सांगत आहे.

व्हीडीओमध्ये तरुण आपण सिल्हेट विभागात असलेल्या सुनमगंज जिल्ह्यात उभे असल्याचे सांगत आहे. हा भारतातील प्रवेशबिंदू आहे. त्यानंतर तो भारताकडे जाणारा रस्ता दाखवतो आणि हेदेखील सांगतो की, जे लोक या मार्गाने प्रवास करतील त्यांना बीएसएफसारखे अडथळे पार करावे लागतील. जर ते पकडले गेले तर त्यांना परिणामही भोगावे लागू शकतात. यानंतर जसजसा व्हीडीओ पुढे जातो त्यात तो भारतातील बीएसफचा कॅम्पही दाखवतो. तसेच काही टनेल दाखवतो ज्यामधून सहजपणे प्रवास केला जाऊ शकतो. यावेळी तो नागरिकांना बेकायदेशीरपणे भारतात जाऊन आपल्या देशाचे नाव बदनाम करू नका, असा सल्लाही देतो.

हा व्हीडीओ तसा जुना आहे, मात्र नव्याने सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आल्यापासून त्याला २ लाखांपेक्षा अधिक व्ह्यू मिळाले आहेत. तसेच ७ हजारांपेक्षा अधिक जणांनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी यावर कमेंट करताना सुरक्षेप्रती चिंता व्यक्त केली आहे. इंस्टाग्राम यूजर यावरून संताप व्यक्त करत आहेत. 'बीएसएफ झोपले आहे का? जर एखाद्या यूट्यूबरला मार्ग माहीत असेल तर सर्वांना माहीत आहे. मग बीएसएफ सीमेवर काय करत आहे? तर 'हो, त्यांना व्हिसा किंवा पासपोर्टची गरज नाही. एकदा त्यांनी बोगदा ओलांडला की, पॅन कार्ड आणि आधार कार्ड विकत घेतात. या, ते मिळवून घुसखोर मतदान करतात , असे एका युजरने म्हटले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest