जगातील सर्वात श्रीमंत कुत्रा चर्चेत, संपत्ती ३,३०० कोटी रुपये

न्यूयॉर्क: जगात अनेक नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती आहे. मात्र, यातील अनेकांना एका श्वानाने संपत्तीच्या बाबतीत मागे टाकले आहे. हो हे खरे आहे. तुम्हाला हे ऐकून धक्का बसला असेल. मात्र, जगात असा एक असे श्वान आहे की ज्याची संपत्ती ३,३०० कोटी रुपये आहे. जातीने जर्मन शेफर्ड असलेल्या या श्वानाचे नाव गुंथर- व्हीआय आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 4 Sep 2024
  • 03:20 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

जातीने जर्मन शेफर्ड असलेल्या गुंथर व्हीआयचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

न्यूयॉर्क: जगात अनेक नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती आहे. मात्र, यातील अनेकांना एका श्वानाने संपत्तीच्या बाबतीत मागे टाकले आहे. हो हे खरे आहे. तुम्हाला हे ऐकून धक्का बसला असेल. मात्र, जगात असा एक असे श्वान आहे की ज्याची संपत्ती ३,३०० कोटी रुपये आहे. जातीने जर्मन शेफर्ड असलेल्या या श्वानाचे नाव गुंथर- व्हीआय आहे.

गुंथर हा श्वान जगातील सर्वात श्रीमंत श्वान ठरला आहे. त्याच्या या संपत्तीमुळे त्याचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. गुंथर या श्वानाकडे खासगी विमान, बोट या सोबतच फिरण्यासाठी बीएमडब्ल्यू कारसह आलिशान वस्तू आहेत. याशिवाय त्याच्या आराम आणि देखभालीसाठी २७ कर्मचाऱ्यांचा ताफाही नेमण्यात आला आहे. गुंथरसाठी एक खास शेफही ठेवण्यात आला असून तो त्यासाठी स्वादिष्ट जेवण तयार करतो.

गुंथरच्या श्रीमंतीचा प्रवास हा १९९९ मध्ये सुरू झाला. त्याच वर्षी कार्लोटा लिबेन्स्टाईन नावाची श्रीमंत स्त्री मरण पावली. तिने आपली संपूर्ण संपत्ती गुंथर ३ नावाच्या श्वानाच्या नावावर केली. गुंथर ३ च्या मालमत्तेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी तिचा इटालियन मित्र मॉरिझियो मियांवर सोपवण्यात आली होती. मियांनी कुशलतेने या संपत्तीची गुंतवणूक व विस्तार केला, ज्यामुळे गुंथर ६ ला गुंथर ३ ची प्रचंड संपत्ती मिळाली. गुंथर-व्हीआयच्या संपत्तीमध्ये केवळ खासगी विमान आणि नौकाच नाही तर त्याच्याकडे इतर सुखसुविधाही आहेत. २७ लोक यासाठी काम करतात, त्यापैकी काही त्याच्या दैनंदिन देखभाल आणि खानपानासाठी जबाबदार आहेत. विशेषत: शेफ त्याचा आवडता आणि खास आहार तयार करतो.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest