USA Election: निवडणुकीच्या धामधुमीत बायडन करोना पॉझिटिव्ह

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना ऐन निवडणुकीच्या धामधुमीत करोना झाला आहे. एक्स अकाऊंटवरून त्यांनी ही माहिती दिली. तसेच व्हाइट हाऊसचे सचिव कॅरन जीन पियरे यांनीही अमेरिकेतील नागरिकांना ज्यो बायडन यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 19 Jul 2024
  • 04:34 pm
Joe Biden, USA Election, Donald Trump, Covid Positive

संग्रहित छायाचित्र

पोस्ट करत स्वतःच दिली माहिती, म्हणाले, 'राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत मीच विजयी होणार !'

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना ऐन निवडणुकीच्या धामधुमीत करोना झाला आहे. एक्स अकाऊंटवरून त्यांनी ही माहिती दिली. तसेच व्हाइट हाऊसचे सचिव कॅरन जीन पियरे यांनीही अमेरिकेतील नागरिकांना ज्यो बायडन यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. बायडेन म्हणाले, आज दुपारी माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र अमेरिकेच्या लोकांसाठी माझे काम सुरू राहील.

राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांचे डॉक्टर केविन ओ कॉनर यांनी सांगितले की, ज्यो बायडन यांच्यात करोनाची काही सौम्य लक्षणे दिसत आहेत. त्यांना सर्दी आणि खोकला झाला आहे. तसेच त्यांना बराच थकवाही जाणवतो आहे. त्यांचा करोना चाचणी अहवाल सकारात्मक आल्यानंतर आम्ही त्यांना अँटी व्हायरल डोस पॅक्सलोव्हिड दिला आहे. सध्या त्यांची प्रकृती बरी आहे. व्हाइट हाऊसनेही याबद्दल माहिती दिली आहे असे डॉक्टर म्हणाले. लास वेगास येथील संमेलनात बायडन भाषण करणार होते. 
त्याआधी त्यांची करोना चाचणी करण्यात आली. ज्यानंतर त्यांना करोना झाल्याचा अहवाल आला. सध्या त्यांना करोनाची सौम्य लक्षणे आहेत. व्हाइट हाऊसचे सचिव पियरे यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्राध्यक्ष बायडेन आता डेलावेयरला परतणार आहेत आणि तिथे ते होम क्वारंटाइन असतील. त्यांनी सोशल मीडियावर अमेरिकेतील नागरिकांना उद्देशून पोस्ट लिहिली आहे. माझी करोना चाचणी आज पॉझिटिव्ह आली आहे. मात्र मी फार आजारी आहे असे मला वाटत नाही. मला आता ठीक वाटत आहे. अमेरिकेतील नागरिकांच्या शुभेच्छा माझ्यासह आहेत. मला लवकरच बरे वाटेल याची मला खात्री आहे. तसेच मी सध्या स्वतःला क्वारंटाइन करतो आहे, मात्र अमेरिकेतल्या नागरिकांसाठी जी कामे करायची आहेत ती मी करत राहणार आहे, असे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.  

यापूर्वीही बिघडली होती प्रकृती
७ जुलैच्या आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांनी आता राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली पाहिजे, अशी चर्चा रंगली होती. या सगळ्यांना उत्तर देत राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीपासून मला केवळ परमेश्वर थांबवू शकतो आणि तो काही खाली येणार नाही, असे वक्तव्य केले होते.  त्यामुळेही बायडन यांची चर्चा झाली होती. “अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होण्यास माझ्यापेक्षा कुणीही लायक उमेदवार मला दिसत नाही. समोर कुणीही असूद्या मला हरवणे कठीण आहे. मी पुन्हा एकदा या पदावर विराजमान होईन याचा विश्वास मला आहे, असेही बायडन यांनी म्हटले होते. आता निवडणुकीच्या ऐन धामधुमीत त्यांना करोना झाला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest