File Photo
पाकिस्तान: आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानवर आता आपली लढाऊ विमाने विकण्याची वेळ येऊन ठेपली आहे. वाढती महागाई आणि डोक्यावरील कर्जाचा डोंगर लक्षात घेत पाकिस्तानने आपल्या ताफ्यातील सक्रिय लढाऊ विमाने विकायला सुरुवात केली आहे. पैशांसाठी पाकिस्तानच्या लष्कराने अझरबैजानसोबत विमान विक्रीचा सौदा केला आहे. दरम्यान या व्यवहाराची आता सोहा मीडियावर खिल्ली उडवली जात आहे.
मुस्लीमबहुल देश अझरबैजानने पाकिस्तानकडून जेएफ-१७ ब्लॉक ३ ही लढाऊ विमाने खरेदी केली आहेत. पाकिस्तानकडून लढाऊ विमाने खरेदी करणारा अझरबैजान हा आता तिसरा देश बनला आहे. विशेषतः ही विमाने पाकिस्तानने चीनकडूनच घेतली आहेत. या पूर्वी इराकनेही जेएफ-१७ ब्लॉक ३ लढाऊ विमाने खरेदी करून आपल्या ताफ्यात सामील केली होती.
पाकिस्तानने अझरबैजानशी जेएफ-१७ ब्लॉक ३ लढाऊ विमानांच्या विक्रीचा करार केला असून त्याची अंदाजित किंमत १.६ बिलियन डॉलर इतकी आहे. यात विमानांसह शस्रास्त्रे आणि प्रशिक्षणाचाही अंतर्भाव आहे. काही यूजरने या करारावर टीका करीत जर खरेदी करायची होती तर जर चांगल्या ठिकाणाहून तरी खरेदी करायची, असे म्हटले आहे. तर काही जणांनी पाहा पाकिस्तान विमानेही विकू लागला आहे. आणि भारत अजून इंजिन-इंजिन करीत बसला आहे.
चीनची मेहरबानी
जेएफ-१७ ब्लॉक ३ ही लढाऊ विमाने पाकिस्तानच्या एयरोनॉटिकल कॉम्प्लेक्स आणि चीनच्या चेंगदू एयरक्राफ्ट इंडस्ट्री ग्रुपद्वारा संयुक्त रूपाने विकसित करण्यात आलेली आहेत. हे विमान एक हलके सिंगल इंजिन असणारे जेट फायटर विमान आहे. हे विमान एव्हीयोनिक्स, एक्टीव्ह इलेक्ट्रॉनिकली स्कॅन्ड एरे रडार, लांबपल्ल्याच्या क्षेपणास्रांनी सुसज्ज आहे. ते हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर हल्ल्यासाठी खास डिझाईन केलेले आहे.