कॅनडातील भारतीयांचे अमेरिका गाठण्याचे प्रमाण वाढले

टोरोंटो : कॅनडामध्ये वास्तव्य केलेल्या भारतीयांची संख्या लक्षणीय असून तेथील मतदानावर त्यांचा मोठा प्रभाव असतो. तेथे स्थायिक होणाऱ्यांत शीख मोठ्या संख्येने आहेत. त्यातच आता कॅनडातून भारतीय मोठ्या संख्येनं अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये स्थलांतर करत असल्याचे निदर्शनास येत आहे. या वर्षी जूनमध्ये ५ हजार १५२ भारतीयांनी अमेरिकेत प्रवेश केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 3 Sep 2024
  • 01:04 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

जूनमध्ये ५ हजारांपेक्षा अधिक भारतीयांनी पायी सीमा ओलांडली

टोरोंटो : कॅनडामध्ये वास्तव्य केलेल्या भारतीयांची संख्या लक्षणीय असून तेथील मतदानावर त्यांचा मोठा प्रभाव असतो. तेथे स्थायिक होणाऱ्यांत शीख मोठ्या संख्येने आहेत. त्यातच आता कॅनडातून भारतीय मोठ्या संख्येनं अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये स्थलांतर करत असल्याचे निदर्शनास येत आहे. या वर्षी जूनमध्ये ५ हजार १५२ भारतीयांनी अमेरिकेत प्रवेश केला आहे. 

गेल्या वर्षी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी हरदीपसिंग निज्जर हत्या प्रकरणात भारताचा हात असल्याचं विधान केल्याने वाद निर्माण केला होता. त्यानंतर भारत व कॅनडा संबंध ताणले गेले होते. त्यात अजूनही अपेक्षित सुसंवाद निर्माण झालेला नाही. कॅनडातून अमेरिकेत बेकायदेशीररीत्या प्रवेश करणाऱ्या भारतीयांचे प्रमाण वाढत आहे. जून महिन्यात तब्बल ५ हजार १५२ भारतीयांनी आवश्यक कागदपत्रांशिवाय अमेरिकेत प्रवेश केला. ताज्या यूएस कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शनच्या अहवालात ही माहिती दिली आहे. गुन्हेगारीमुळे अशांत असणाऱ्या मेक्सिकोमधून डिसेंबर २०२३ पासून अमेरिकेत आलेल्या नागरिकांपेक्षा भारतीयांचे प्रमाण अधिक आहे. अमेरिका व कॅनडामध्ये जवळपास ९ हजार किलोमीटरची खुली सीमारेषा आहे. ही जगातली सर्वात लांब खुली सीमा मानली जाते. मेक्सिको, अमेरिकेच्या सीमेपेक्षा ही सीमा दुप्पट तर भारत व चीनच्या ३४०० किलोमीटरच्या सीमेपेक्षा जवळपास तिप्पट लांबीची आहे.

अमेरिकी आकडेवारीनुसार, कॅनडातून अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या भारतीयांचं प्रमाण जानेवारी ते जून दरम्यान तब्बल ४७ टक्क्यांनी वाढलं आहे. जानेवारीत हे प्रमाण २५४८ होतं. जूनपर्यंत ते महिन्याला ३,७३३ नागरिक एवढे होते. जूनमध्ये ५१५२ भारतीयांनी अमेरिकेत अवैधरीत्या पायी प्रवेश केला. यात अवैधरीत्या प्रवेश करणाऱ्यांना ताब्यात घेणे, त्यांची पुन्हा कॅनडात पाठवणी करणे किंवा सीमेवरच त्यांना प्रवेश नाकारणे, अशा उपायांचा अवलंब अमेरिका करत असते. एकीकडे अमेरिकेत कायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या भारतीयांचे प्रमाण वाढत असताना दुसरीकडे बेकायदेशीररीत्या प्रवेश करणाऱ्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अमेरिकेत कायदेशीर वास्तव्य करणाऱ्या भारतीयांचं प्रमाण एकूण लोकसंख्येच्या १.५ टक्के इतकं आहे. त्यांचा अमेरिकेच्या एकूण प्राप्तिकर भरण्यामधला हिस्सा तब्बल ५ ते ६ टक्क्यांच्या घरात आहे.

अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर इतर देशातील नागरिकांकडून कॅनडाच्या भूमीचा वापर केला जात असल्याचं बोललं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर कॅनडातील व्हिसा प्रक्रिया अधिक कठोर करावी अशी मागणी अमेरिका करत असते. या प्रक्रियेतील कच्च्या दुव्यांचा फायदा घेऊन इतर देशातील नागरिक कॅनडाचा व्हिसा मिळवतात व तेथून खुल्या सीमा भागातून अमेरिकेत प्रवेश करतात.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest