न्यूयॉर्क : अमेरिकेत पुन्हा मंदिराची विटंबना; बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिराची तोडफोड

न्यूयॉर्कमध्ये एका मंदिराची १० दिवसांपूर्वी विटंबना करण्यात आली होती. या विरोधात भारतीय दूतावासाने निषेध नोंदवला होता. आता कॅलिफोर्नियातील बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिराची गुरुवारी तोडफोड करण्यात आली.

New York, temple, Vandalism, Indian Embassy protest, BAPS Sri ,Swaminarayan temple California, Recent incident

File Photo

न्यूयॉर्क : न्यूयॉर्कमध्ये एका मंदिराची १० दिवसांपूर्वी विटंबना करण्यात आली होती. या विरोधात भारतीय दूतावासाने निषेध नोंदवला होता. आता कॅलिफोर्नियातील बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिराची गुरुवारी तोडफोड करण्यात आली. 'हिंदूंनो परत जा' अशा हिंदूविरोधी घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

न्यूयॉर्कमधील मेलव्हिल येथील स्वामीनारायण मंदिराची विटंबना झाल्यानंतर १० दिवसांनी सॅक्रामेंटो कॅलिफोर्निया येथील आमच्या मंदिराची विटंबना करण्यात आली आहे. द्वेषपूर्ण संदेशांसह ही तोडफोड करण्यात आली, अशी माहिती बीएपीएस हिंदू संघटनेने एका निवेदनातून दिली. आमचा निषेध कायम राहील. आमचे दुःख यामुळे आणखीच वाढले आहे.

अंतःकरणात द्वेष असलेल्या प्रत्येकासाठी आमच्या प्रार्थना अधिक दृढ झाल्या आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे. अमेरिकेच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सॅक्रामेंटा काऊंटीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अमी बेरा यांनी या घटनेचा निषेध केला आणि लोकांना असहिष्णुतेविरोधात उभे राहण्याचे आवाहन केले.

सॅक्रामेंटोमध्ये धार्मिक कट्टरता आणि द्वेषाला जागा नाही. आपल्या समाजातील या उघड कृत्याचा मी तीव्र निषेध करतो. आपण सर्वांनी असहिष्णुतेच्या विरोधात उभे राहायला हवे आणि आपल्या समाजातील प्रत्येकाला सुरक्षित आणि आदरणीय वाटेल याची खात्री केली पाहिजे, असे त्यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.

हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने सिनेट न्यायिक समितीला पत्र लिहून एफबीआय आणि कॅलिफोर्निया या दोन्ही राज्यांच्या डेटाचा हवाला देऊन हिंदूंविरोधी द्वेषाचा इतिहास आणि विशेषतः हिंदू प्रार्थनास्थळांबाबत चिंताजनक वाढ यावर तपशीलवार अहवाल दिला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest