टेलिग्रामचे सीईओ पावेल दुरोव्ह यांना अटक

पॅरिस: टेलिग्राम मेसेजिंग ॲपचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पावेल दुरोव्ह यांना शनिवारी (२४ ऑगस्ट) फ्रान्सच्या पॅरिसनजीक असलेल्या बॉर्गेट विमानतळावरून अटक करण्यात आली. फ्रान्समधील माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार दुरोव्ह आपल्या खासगी विमानातून फ्रान्समध्ये आले असताना पोलिसांनी त्यांना अटक वॉरंट देत ताब्यात घेतले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 26 Aug 2024
  • 02:17 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

ॲपमुळे गुन्हेगारी वाढल्याचा दावा, रशियाचा अटकेनंतर संताप

पॅरिस: टेलिग्राम मेसेजिंग ॲपचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पावेल दुरोव्ह यांना शनिवारी (२४ ऑगस्ट) फ्रान्सच्या पॅरिसनजीक असलेल्या बॉर्गेट विमानतळावरून अटक करण्यात आली. फ्रान्समधील माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार दुरोव्ह आपल्या खासगी विमानातून फ्रान्समध्ये आले असताना पोलिसांनी त्यांना अटक वॉरंट देत ताब्यात घेतले.

टेलिग्रामने कंटेट मॉडरेटरची कमतरता असल्याची चौकशी फ्रान्स पोलिसांकडून केली जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मॉडरेटरची कमतरता असल्यामुळे टेलिग्रामवर गुन्हेगारी कृत्य वाढले आहेत. दरम्यान टेलिग्रामकडून अद्याप या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तसेच फ्रान्सचे गृहखाते आणि पोलिसांनीही अधिकृत टिप्पणी केलेली नाही. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने मात्र या अटकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून अटकेची कारणे उघड करण्याची मागणी केली आहे. तसेच पाश्चिमात्य देशातील स्वयंसेवी संस्थांनी दुरोव्ह यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले आहे.

पावेल दुरोव्ह कोण आहेत?

३९ वर्षीय पावेल दुरोव्ह यांचा जन्म रशियात झाला. २०१३ साली त्यांनी टेलिग्रामची स्थापना केली होती. गोपनियता, एनक्रिप्शन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केल्यामुळे टेलिग्रामने अल्पावधीतच चांगली लोकप्रियता मिळविली. २०१४ साली दुरोव्ह यांना रशियातून बाहेर पडावे लागले होते. विरोधकांच्या अकाऊंटला टेलिग्रामवरून काढून टाकावे, अशी मागणी केल्यानंतर दुरोव्ह यांनी त्यास विरोध दर्शविला होता. २०१७ साली ते दुबईत राहू लागले होते आणि २०२१ साली त्यांनी फ्रान्सचे नागरिकत्व स्वीकारले.

टेलिग्रामशी निगडित वाद

टेलिग्रामची स्थापना झाल्यापासून जगभरातील अनेक सरकारांनी ॲपवर नियंत्रण आणावे, यासाठी दबाव आणला आहे. मात्र दुरोव्ह यांनी विविध देशातील सरकारांचा दबाव झुगारून लावला. त्यामुळे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते असल्याची त्यांची प्रतिमा तयार झाली. दरम्यान गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारी कृत्यांसाठी टेलिग्रामचा वापर झाल्याचा आरोप केला जात आहे. कट्टरपंथीय आणि गुन्हेगार टेलिग्रामच्या एनक्रिप्शनशी छेडछाड करून अवैध कामे करत आहेत. त्यामुळे युरोपियन देश खासकरून फ्रान्स टेलिग्रामच्या मॉडरेशन धोरणावर टीका करत आला आहे. युक्रेन आणि रशियामध्ये टेलिग्राम प्रामुख्याने अधिक प्रमाणात वापरले जाते. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि त्यांचे सरकारी अधिकारी संवादासाठी टेलिग्रामचा वापर करतात. तसेच रशियामधील सरकारी विभाग, अधिकारीही टेलिग्रामचा अधिकृतपणे वापर करतात. दोन्ही देशांत युद्ध छेडल्यानंतर या युद्धासंबंधी महत्त्वाची माहिती मिळण्याचे ठिकाण म्हणून टेलिग्रामकडे पाहिले जाते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest