पेजर स्फोटानंतर महासत्ता सावध; हायब्रीड वॉरफेअरचे आव्हान

न्यूयॉर्क : लेबनानमधील पेजर स्फोटाचा धक्का हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेला बसला. या स्फोटात हिजबुल्लाहचे २० पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले. सुमारे चार हजार लोक जखमी झाले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 25 Sep 2024
  • 02:20 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

चीनच्या सॉफ्टवेअर अन् हॉर्डवेअरवर बंदीची तयारी

न्यूयॉर्क : लेबनानमधील पेजर स्फोटाचा धक्का हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेला बसला. या स्फोटात हिजबुल्लाहचे २० पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले. सुमारे चार हजार लोक जखमी झाले. 

या पेजर स्फोटाचा धसका फक्त लेबनाननेच घेतला नाही तर जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेनेही घेतला आहे. यामुळे घटनेनंतर अमेरिका आता सतर्क झाला आहे. अमेरिकेच्या वाणिज्य विभागाला सुरक्षेची चिंता भेडसावू लागली आहे. यामुळे अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या गाड्यांमधील चीन सॉफ्टवेअर अन् हार्डवेअरवर बंदी आणण्याचा विचार सुरू झाला आहे.

अमेरिकेचे वाणिज्य सचिव जीना रेमोंडो यांनी म्हटले आहे की, रस्त्यावर लाखो गाड्या चालत असतील आणि अचानक सॉफ्टवेअर निष्क्रिय केले गेले तर किती मोठा विनाश होईल. त्यामुळे चीनमधून आयात होणाऱ्या ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग सिस्टम सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर असलेल्या वाहनांच्या आयात आणि विक्रीवर बंदी घालण्याचा धोरणात्मक विचार सुरू आहे. अमेरिकन रस्त्यावर धावणारी जवळपास सर्व वाहने कनेक्टेड आहेत. या वाहनांमध्ये ऑनबोर्ड नेटवर्क हार्डवेअर आहे. त्यातून इंटरनेटच्या माध्यमातून गाडी आत आणि बाहेर दोन्ही डिव्हाइससह डेटा शेअर करते. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतील खासदारांनी एक चिंता व्यक्त केली होती. त्यांनी म्हटले होते की, चिनी ऑटो आणि टेक कंपन्या वाहनांची चाचणी करताना संवेदनशील डेटा गोळा करतात. हा डेटा ते भविष्यात वापरू शकतात.  ब्रिटिश मीडियाच्या अहवालात असा दावा करण्यात आला होता की, गुप्तचर अधिकाऱ्यांना चिनी स्पायवेअरबद्दल चिंता व्यक्त केली होती. यासाठी त्यांनी शासकीय व मुत्सद्दी वाहनांची तपासणी करून घेतली होती. तपासणीत किमान एक सिम कार्ड सापडले जे लोकेशनचा डेटा पाठवत होते. हे उपकरण एका चिनी पुरवठादाराकडून खरेदी करण्यात आले होते. 

डेटा लीक होण्याची शक्यता

लेबनॉनमध्ये पेजर आणि वॉकी-टॉकी स्फोटापूर्वी इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे हेरगिरीचे काम केले जाऊ शकते, असे मानले जात होते. परंतु आता या स्फोटानंतर नवीन प्रकारच्या युद्धाचा धोका वाढला आहे. खूप लांब राहून इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे स्फोट करू शकतो. यामुळे निष्क्रिय करून मोठा विनाश घडवण्याची शक्यता आहे. चीनमधील शेन्झेन येथील हुआई ही दूरसंचार कंपनी, अनेक वर्षांपासून चीन आणि अमेरिका यांच्यातील तंत्रज्ञानाच्या केंद्रस्थानी आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी याबाबत चेतावणी दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, चिनी अधिकारी हे उपकरण हेरगिरीसाठी वापरू शकतात. परंतु चीनने हे आरोप फेटाळले आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest