संग्रहित छायाचित्र
लंडन: इंग्लंडमध्ये हुजूर पक्षात विरोधी पक्षनेतेपदासाठी निवडणूक होणार असून माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या जागी पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यासाठी उमेदवारांना तीन महिने आपली बाजू पक्षात मांडावी लागणार आहे. त्यात भारतीय वंशाच्या प्रिती पटेल आघाडीवर आहेत.
४ जुलै रोजी झालेल्या निवडणुकीत हुजूर पक्षाचा दारूण पराभव झाला. यामुळे पक्षाला १४ वर्षांची सत्ता गमावावी लागली. त्यामुळेच आता हुजूर पक्षात नवा विरोधी पक्षनेता निवडला जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी ३१ ऑक्टोबरला पक्षामध्ये निवडणुका होणार असून, त्याचा निकाल २ नोव्हेंबरला लागणार आहे. सुनक यांच्या जागी भारतीय वंशाच्या प्रीती पटेल या शर्यतीत आहेत. प्रीती पटेल यांच्याशी कॅमी बेडनोच, रॉबर्ट जेनरिक, जेम्स क्लेव्हरली, टॉम तुगेंधात आणि मेल स्ट्राइड स्पर्धा करतील. प्रिती पटेल पहिल्यांदा २०१० मध्ये विथम, एसेक्स येथून खासदार बनल्या. जून २०१४ मध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात बीबीसीच्या एकतर्फी वार्तांकनाबद्दल जोरदार टीका केली. या काळात त्यांची भारतात खूप चर्चा झाली.
प्रीती मूळच्या गुजराती असून त्या मोदींच्या समर्थक मानल्या जातात. प्रितीचा जन्म २९ मार्च १९७२ रोजी लंडनमध्ये झाला. त्याचे पालक १९६० मध्ये युगांडातून ब्रिटनमध्ये स्थलांतरित झाले. प्रीतीने अर्थशास्त्रात पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. प्रिती पटेल या बोरिस जॉन्सन गटाच्या नेत्या होत्या. तसेच त्या सुनक विरोधी नेत्या मानल्या जातात. प्रीती बोरिस जॉन्सन सरकारमध्ये गृहमंत्री होत्या. थेरेसा मे यांची जागा घेऊन बोरिस जॉन्सन यांना पंतप्रधान करण्यासाठी हुजूर पक्षात बॅक बोरिस मोहीम सुरू होती. यात प्रीती यांचा त्यात महत्त्वाचा भाग होता. प्रीती उजव्या विचारसरणीच्या नेत्या आहेत. इमिग्रेशन आणि कायदा आणि सुव्यवस्थेबाबत तिच्या कठोर भूमिकेसाठी ओळखल्या जातात. प्रिती पटेल यांना उजव्या विचारसरणीच्या मतदारांचा मोठा पाठिंबा आहे.
या शर्यतीत असलेली दुसरी महिला केमी बडेनोच आहे. सुनकच्या जागी बडेनोच या सट्टेबाजांच्या आवडत्या उमेदवार आहेत. त्या नायजेरिया, अमेरिकेत वाढल्या आहेत. रॉबर्ट जेनरिकला इमिग्रेशन समस्या हाताळण्याचा अनुभव आहे. ते गृहनिर्माण मंत्री होते. २०२१ मध्ये त्यांना जॉन्सन यांनी मंत्री पदावरून हटवले. जेम्स क्लेव्हरली यांनी परराष्ट्रमंत्री, गृहमंत्री आणि शिक्षणमंत्री ही पदे भूषवली आहेत. त्यांचे मुत्सद्देगिरीमध्ये नैपुण्य आहे.