रशिया : रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी दिली अणुयुद्धाची धमकी

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बुधवारी (२५ सप्टेंबर) पाश्चिमात्य देशांना आण्विक अस्त्र वापरण्याची धमकी दिली. राजधानी मॉस्कोमध्ये पुतिन यांनी सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावली होती. यात त्यांनी अण्वस्त्रांच्या वापरासंबंधातील अटी आणि शर्ती बदलणार असल्याचेही या बैठकीत सांगितले.

Vladimir Putin, Russian President, Threat to the West, Nuclear weapons, Emergency meeting, Security Council, Moscow, Change in terms and conditions

File Photo

मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बुधवारी (२५ सप्टेंबर) पाश्चिमात्य देशांना आण्विक अस्त्र वापरण्याची धमकी दिली. राजधानी मॉस्कोमध्ये पुतिन यांनी सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावली होती. यात त्यांनी अण्वस्त्रांच्या वापरासंबंधातील अटी आणि शर्ती बदलणार असल्याचेही या बैठकीत सांगितले. युक्रेनला पाश्चिमात्य देशांकडून क्रूझ क्षेपणास्त्रांचा पुरवठा झाला आहे. याचा वापर करून रशियावर दूरच्या अंतरावरूनही क्षेपणास्त्र डागता येणार आहे. याचा आढावा घेतल्यानंतर पुतिन यांनी तातडीची बैठक घेतली.

अण्वस्त्र नसलेल्या देशाने जर अण्वस्त्रधारी देशांच्या मदतीने रशियाच्या भूमीवर क्षेपणास्त्राचा हल्ला केल्यास तो अण्वस्त्र हल्ला समजण्यात येईल आणि त्याला अण्वस्त्रांनी उत्तर दिले जाईल, अशी धमकीच पुतिन यांनी दिली. रशियाने आण्विक धोरणात बदल करण्याची घोषणा केल्यामुळे आता अमेरिका आणि युरोपियन देशांसमोर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

युक्रेनला रशियावर क्षेपणास्त्र डागण्याची परवानगी द्यायची की नाही, असा प्रश्न आता या देशांसमोर उभा राहिला आहे. जागतिक पटलावरील परिस्थिती झपाट्याने बदलत असून रशियासमोर निर्माण झालेले नवीन धोके पाहता आण्विक धोरणात बदल आवश्यक आहेत, असे पुतिन यांनी सुरक्षा सल्लागार बैठकीत सांगितले.

रशियाने २०२० मध्ये आण्विक सिद्धांत लागू केला होता. रशियाचे अस्तित्व जर धोक्यात येत असेल तर अण्वस्त्रांचा वापर केला जाऊ शकतो, असे या सिद्धांतात नमूद केले होते. ७१ वर्षीय पुतिन आता या सिद्धांतात बदल करू इच्छित आहेत. अण्वस्त्र नसलेल्या कोणत्याही देशाने अण्वस्त्र असलेल्या देशाच्या मदतीने किंवा पाठिंब्याने रशियन महासंघावर हल्ला केला तर तो रशियावरील संयुक्त हल्ला मानला जावा, असा नवा मुद्दा पुतिन यांनी जोडला आहे. रशियाच्या भूमीवर क्षेपणास्त्र, हवाई किंवा ड्रोनच्या मदतीने हल्ला झाल्यास रशियाही अण्वस्त्रांचा वापर करण्याच्या हालचाली सुरू करेल. 

धोरणच बदलण्याचा निर्णय कशासाठी?

‘अण्वस्त्रांचा वापर कोणत्या परिस्थितीत करू शकतो’ हे निश्चित करणाऱ्या सैद्धान्तिक धोरणात बदल करण्याचा निर्णय रशियाने घेतला आहे. याचा अर्थ असा की, अण्वस्त्रे कधी आणि कुणावर वापरायची याचे स्वत:साठीच आखून दिलेले नियम रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन बदलणार आहेत. जून २०२० मध्ये पुतिन यांनी सहा पानी फर्मान काढले होते.

त्यात आपले राष्ट्र आणि / किंवा मित्रराष्ट्रांविरुद्ध तसेच आक्रमणाच्या प्रसंगी अण्वस्त्रे किंवा अन्य सामुदायिक विनाशाच्या अस्त्रांचा वापर झाल्यास तसेच, आपल्या राष्ट्राचे अस्तित्वच धोक्यात येईल अशा पद्धतीने पारंपरिक अस्त्रांचा वापर झाल्यास प्रतिसाद म्हणून अण्वस्त्रांचा उपयोग करण्याचा अधिकार रशिया राखून ठेवत आहे. या आदेशात नेमकी ‘जोखीम’ काय, याची नेमकी व्याख्या करण्यात आलेली नाही. याचा आधार घेत फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनमध्ये पाश्चिमात्य देशांनी आपले सैन्य पाठवले तर अण्वस्त्रांचा वापर करण्याचा गर्भित इशारा पुतिन यांनी दिला होता.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest