कोलंबो : चीनसमर्थक दिसानायके होणार श्रीलंकेचे नवे अध्यक्ष; भारतासमोरील अडचणी वाढणार

भारताशी पौराणिक नाते असलेला श्रीलंका देश सध्या आर्थिक संकट आणि मोठ्या राजकीय पेचप्रसंगाला तोंड देत आहे. अशा स्थितीवर मात करत असताना श्रीलंकेत पहिल्यांदा अध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्या आहेत.

Sri Lanka, economic, crisis, political, dilemma, legendary, relationship, India, presidential elections

भ्रष्टाचारविरोधी नेता या प्रतिमेमुळे सामान्य नागरिकांमध्ये लोकप्रिय

कोलंबो : भारताशी पौराणिक नाते असलेला श्रीलंका देश सध्या आर्थिक संकट आणि मोठ्या राजकीय पेचप्रसंगाला तोंड देत आहे. अशा स्थितीवर मात करत असताना श्रीलंकेत पहिल्यांदा अध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्या आहेत. यामध्ये देशातील डाव्या विचारसरणीच्या नॅशनल पीपल्स पॉवरच्या (एनपीपी) नेत्या अनुरा कुमारा दिसानायके यांनी निवडणुकांत निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. त्यामुळे चीन समर्थक दिसानायके देशाचे अध्यक्ष होणार ही काळ्या दगडावरची रेघ मानली जाते.

मतमोजणीची शेवटची आकडेवारी हाती येईपर्यंत दिसानायके ५४ टक्के मतांसह बहुमताकडे वाटचाल करत होते. दिसानायके हे श्रीलंकेचे १० वे  अध्यक्ष होतील. गोटाबाया राजपक्षे यांची पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर अध्यक्षपदी विराजमान झालेले रानिल विक्रमसिंघे यांचा पक्ष निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी अपक्ष म्हणून या निवडणुका लढवल्या होत्या.

दिसानायके हे कोलंबोचे खासदार आहेत. ते नॅशनल पीपल्स पार्टी आणि जेव्हीपी या पक्षाचे नेतृत्व करतात. त्यांची भूमिका कायम भारतविरोधी राहिली आहे. ते चीन समर्थक मानले जातात. २०२२ मध्ये श्रीलंकेच्या आर्थिक आणि राजकीय संकटानंतर त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. गरिबांचा मसिहा आणि भ्रष्टाचारविरोधी नेता अशी त्यांची प्रतिमा सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. २०१९ मध्येही त्यांनी राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवली आहे. मात्र, त्यांना त्यावेळी निवडणुकीत अपयश आले होते. त्यावेळी त्यांना केवळ ३ टक्के मते मिळाली होती.  

दिसानायके यांच्या पक्षाचे संसदेत केवळ तीन नेते आहेत. त्यांचा पक्ष चीनने देशातील अर्थव्यवस्थेत केलेल्या हस्तक्षेपाचे समर्थन करतो. याशिवाय बंद बाजाराच्या आर्थिक धोरणावरही त्यांचा विश्वास आहे. खरे बघायला गेले तर श्रीलंकेवरील सध्याच्या आर्थिक संकटासाठी सगळेजण चीनला जबाबदार मानतात. चीनच्या कर्जाच्या सापळ्यात अडकल्यानंतर श्रीलंकेची अवस्था बिकट झाली. त्याचबरोबर वाईट काळात चीनने मदतीसाठी हातदेखील पुढे केला नाही.

रानिल विक्रमसिंघे यांचे परराष्ट्रमंत्री अली साबरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर विजयाबद्दल दिसानायकेचे अभिनंदन केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, प्रदीर्घ प्रचारानंतर आता निवडणुकीचे निकाल स्पष्ट आले आहेत. मी जनादेशाचा आदर करतो. गेल्या निवडणुकीत दिसानायके यांच्या पक्षाला केवळ तीन टक्के मते मिळाली होती. यावेळी त्यांनी भ्रष्टाचार हा मुद्दा बनवला आणि श्रीलंकेचे नशीब बदलण्याचे स्वप्न दाखवून ते लोकप्रिय झाले आहेत. 

अदानी प्रकल्प रद्द होणार 

मार्क्सवाद आणि लेनिनवादाकडे दिसानायके यांचा कल असलेला लक्षात घेता त्यांची भूमिका भारतविरोधी असेल आणि त्यामुळे भारताच्या अडचणी वाढू शकतात. भारत-श्रीलंका शांतता कराराद्वारे श्रीलंकेतील संघर्षावेळी भारताने केलेल्या हस्तक्षेपाला त्यांनी विरोध केला होता. अलीकडेच त्यांनी अदानी समूहाचा ४८४ मेगावॅटचा श्रीलंकेतील ४४४ कोटींचा करार रद्द करण्याबाबतही भाष्य केले होते. ते अध्यक्ष झाल्यानंतर हा प्रकल्प रद्द केला जाईल, असे त्यांनी निवडणूक प्रचारावेळी सांगितले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest