खेळता खेळता तिने बॉयफ्रेंडला सुटकेसमध्ये केले बंद, प्रियकराचा श्वास गुदमरून मृत्यू
फ्लोरिडा : एक अशी बातमी ज्यानंतर सर्वांना धक्का बसला आहे. ही बातमी विचित्र वाटत असली तरी कधी कधी अशा घटना घडतात ज्यावर विश्वास ठेवणेही कठीण असते. लपंडाव हा खेळ लहानपणी सर्वांनीच कधी ना कधी खेळला आहे, पण या महिलेने लपंडाव खेळताना हद्दच केली. या महिलेने खेळा-खेळात प्रियकराला सुटकेसमध्ये बंद केले. धक्कादायक म्हणजे त्यानंतर ती दारू पिऊन झोपून गेली.
या महिलेचे नाव बून असे आहे. ४७ वर्षीय बूनने सुरुवातीला सांगितले की, ती आणि तिचा प्रियकर जॉर्जेस फेब्रुवारी २०२० मध्ये दारू पिऊन लपंडाव खेळत होते. जेव्हा तो स्वेच्छेने सुटकेसमध्ये गेला. हा सगळा विनोदाचा भाग होता. तेव्हा तिने त्याला बाहेरून बंद केले आणि सुटकेसवर एक साखळी घातली. महिलेने पुढे सांगितले की, तिच्या प्रियकराने काही काळापूर्वी तिच्यावर अत्याचार केला होता आणि जेव्हा तो सुटकेसमध्ये बंद होता तेव्हा तिने तिच्या भावना व्यक्त करण्याचा विचार केला. दोघांमध्ये वाद सुरू झाला. आता त्या महिलेला वाटू लागले की जर तिचा प्रियकर जॉर्जेस टोरेस ज्युनियर अशा वेळी बाहेर आला तर तो तिच्यावर हल्ला करू शकतो. अशा स्थितीत तिने त्याला पेटीमध्येच राहू दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा गुदमरून मृत्यू झाला.
बूनच्या फोनवरून मिळालेल्या व्हीडीओ रेकॉर्डिंगमध्ये, ती हसताना आणि सुटकेसमध्ये बेसबॉल बॅटने हात मारताना दिसत आहे. कारण त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. न्यायालयात दाखवण्यात आलेल्या व्हीडीओमध्ये बूनचा प्रियकर त्याला श्वास घेऊ शकत नसल्याचे वारंवार सांगत असल्याचे दिसत आहे. यावेळी महिला हसत होती. जेव्हा तिने मदतीसाठी हाक मारली तेव्हा ती महिला म्हणाली, 'तू माझा गळा दाबून मारतोस तेव्हा तेच करतोस' आणि 'ही तुझी चूक आहे. यानंतर महिला दारू पिऊन झोपी गेल्याचे सांगण्यात आले.
द गार्डियनच्या म्हणण्यानुसार, जॉर्जेसच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्याच्या पाठीवर आणि मानेवर ओरखडे, त्याच्या खांद्यावर, टाळूवर आणि कपाळावर जखमा आणि त्याच्या ओठाजवळ एक कट यासह अनेक जखमांचा उल्लेख आहे. घटनेच्या चार वर्षांनंतर, १० दिवसांच्या खटल्यात ज्युरीने नुकतेच तिच्या विरोधात निकाल दिला आहे. अमेरिकेतील फ्लोरिडामधील न्यायालयाने सारा बून या महिलेला सेकंड-डिग्री हत्येप्रकरणी दोषी ठरवले आहे. तिला २ डिसेंबरला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.