‘न्यू मुरब्बा’ला सर्वच मुस्लीम देशांतून विरोध

दुबई: सौदी अरेबिया ही पश्चिम आशियातील मोठी शक्ती व्हावी अशी सौदीच्या राजकर्त्यांची महत्त्वकांक्षा लपून राहिलेली नाही. त्यातून सौदी अरेबिया हा देश राजधानी रियाधच्या मध्यभागी एक स्वप्नांचं शहर बनवणार आहे ज्याचे नाव आहे न्यू मुरब्बा. साैदी अरेबियाचा राजकुमार मोहम्मद बिन सलमानच्या नेतृत्वात निर्माण होणाऱ्या या अवाढव्य परंतु आता सर्वच मुस्लीम देशांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 28 Oct 2024
  • 03:26 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

जगातील सर्वांत हायटेक शहर, सौदी अरेबियाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प

 दुबई: सौदी अरेबिया ही पश्चिम आशियातील मोठी शक्ती व्हावी अशी सौदीच्या राजकर्त्यांची महत्त्वकांक्षा लपून राहिलेली नाही. त्यातून सौदी अरेबिया हा देश राजधानी रियाधच्या मध्यभागी एक स्वप्नांचं शहर बनवणार आहे ज्याचे नाव आहे न्यू मुरब्बा. साैदी अरेबियाचा राजकुमार मोहम्मद बिन सलमानच्या नेतृत्वात निर्माण होणाऱ्या या अवाढव्य  परंतु आता सर्वच मुस्लीम देशांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे.

कारण या शहराचा नकाशा काबा आणि मक्काशी या मुस्लीम धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र असणाऱ्या दोन शहरांशी साधर्म्य असणारा आहे. त्यामुळे अनेक मुस्लीम देश सौदीच्या या प्रकल्पावर नाराज आहेत. इस्लाममध्ये ही सर्वात पवित्र क्षेत्र आहेत. क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमाननं मागच्या वर्षी सौदी व्हिजन २०३० नुसार या प्रकल्पाची घोषणा केली होती.

मानवाधिकार संघटनांनी देखील या प्रकल्पाच्या निर्मितीबाबत काळजी व्यक्त केली आहे. हा प्रकल्प तयार करत असताना प्रवासी मजुरांचे शोषण करण्यात येईल तसेच अनेक स्थानिकांना यामुळे विस्थापित व्हावं लागेल, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.

न्यू मुरब्बा जगातील हे सर्वात आधुनिक शहर निर्माण केले जाणार आहे. सौदी अरेबियाची ओळख बदलणाऱ्या या शहराच्या निर्मितीवर मुस्लीम मात्र नाराज आहेत.

न्यू मुरब्बा डेव्हलपमेंट कंपनी या प्रोजेक्टची निर्माती आहे. याबाबतच्या रिपोर्टनुसार १९ चौरस किलोमीटर परिसरात होणाऱ्या या नव्या प्रोजेक्टमध्ये १०४ हजार निवासी युनिट्स, ९ हजार हॉटेल रुम्स आणि  ९८० हजार चौरस मीटरपेक्षा जास्त रिटेल भाग असेल. या हायटेक शहरातील मोठा भाग ऑफिससाठी राखून ठेवण्यात आला. कार्यालयांसाठी खास जागा तिथे विकसित करण्यात येणार आहे. सौदी अरेबियाच्या सार्वजनिक गुंतवणूक निधीनुसार,  मुकाब २० एम्पायर स्टेट इमारती ठेवण्याइतका मोठा असेल. मुकाबचा अरबी अर्थ घन (क्यूब) असा आहे. हे जगातील सर्वात मोठे इनडोर शहर असेल असे डेव्हलपर्सचे मत आहे.

काय आहे असे नवे हायटेक तंत्रज्ञान

'द मुकाब' हे मेगास्ट्रक्चर एक प्रस्तावित क्यूबिकल संरचना आहे. हे तयार झाल्यानंतर तेराशे फूट उंच आणि बाराशे फूट रुंद असेल. ही जगातील सर्वात मोठी इमारत संरचना म्हणून पुढे येणार आहे. या शहरात महागडी रेस्टॉरंट्स, दुकाने तसेच राहण्यासाठी सर्व अत्याधुनिक सोयींसह सज्ज घरे असतील. या प्रकल्पातील इमारतींच्या बाहेरच्या भिंती या आभासी तंत्रज्ञानानं सजवण्यात येतील. त्यावर स्थानिकांना अद्भुत दृश्य पाहण्याचा आनंद मिळेल. आतील भागात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) द्वारे तयार करण्यात आलेले विशाल होलोग्राफिक प्रोजेक्शन्स असतील.

या सर्व वैशिष्ट्यांसह अनेक खास सुविधा देखील या शहरात देण्याचा सौदी अरेबियाचा विचार आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार क्यूब-डिझाइन केलेल्या या मोठ्या शहराची रचना पारंपरिक नजदी स्थापत्य शैलीपासून प्रेरणा घेणारी असेल. 

हे जगातील पहिले इमर्सिव्ह डेस्टिनेशन असेल.

या शहरात पायी चालणाऱ्यांना प्रसन्न वाटावं म्हणून ठिकठिकाणी झाडं लावण्यात येतील. सायकल चालण्यासाठी खास रस्ते तयार करण्यात येणार आहेत. या शहरात इमर्सिव थिएटर तसंच ८० पेक्षा जास्त मनोरंजन आणि सांस्कृतिक केंद्र तयार करण्यात येणार आहेत. या शहराची दळणवळण व्यवस्था देखील हायटेक असेल.  विमानतळासह कोणत्याही भागात जाण्यासाठी २० मिनिटांपेक्षा कमी वेळ लागेल, याची खबरदारी घेऊन या शहराची निर्मिती केली जाणार आहे.

२०३० पर्यंत पूर्ण होणार प्रकल्प

सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पातून सौदीमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. हा प्रोजेक्ट २०३० पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून त्यामध्ये तीन लाखांपेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळेल असा अंदाज आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest