File Photo
न्यूयॉर्क: जगातील लोकसंख्येमध्ये हिंदू लोकसंख्या अवघी १५ टक्के आहे. प्यू रिसर्च सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, २०५० पर्यंत हिंदुंची लोकसंख्या १.४ बिलियनपर्यंत पोहोचेल. पण अलीकडील काही अहवालानुसार हिंदूंची लोकसंख्या सातत्याने घटत चालली आहे, असा दावा करण्यात येत आहे. जगातील काही मोजक्याच देशात हिंदू लोकसंख्या आढळते मात्र काही देशांत ती अजिबात आढळत नाही.
हिंदू धर्म हा जगातील तिसरा मोठा धर्म आहे. जगात १.२ बिलियन हिंदू लोकसंख्या आहे. भारतामध्ये सर्वाधिक हिंदू लोकसंख्या आहे. भारतात हिंदुंची लोकसंख्या ९६६ मिलियन आहे. तर नेपाळ असा दुसरा देश आहे, जिथे हिंदुंची संख्या मोठी आहे. येथे हिंदू धर्म मानणारे २३.५ मिलियन लोक राहतात.
बांगलादेशमध्ये तिसरी सर्वात जास्त हिंदू लोकसंख्या राहते. बांगलादेशमध्ये १४.३ मिलियन लोक राहतात. तर हिंदु लोकसंख्येमध्ये इंडोनेशियाचा चौथा क्रमांक लागतो. येथे ४.४ मिलियन हिंदू लोकसंख्या आहे.
जगातील साधारण मोठ्या देशांमध्ये हिंदुंची आणि भारतीयांची लोकसंख्या तुम्हाला सापडेल. सौदी अरबमध्ये हिंदु धर्माला अधिकृत मान्यता नाही. येथे इस्लामशिवाय इतर कोणत्या धर्माला परवानगी नाही. कडक नियमांमुळे येथे हिंदुंची लोकसंख्या खूपच कमी आहे. नॉर्थ कोरीयाचे कायदे किती कडक आहेत, जे जगापासून लपलेले नाही.
येथे नास्तिकतेला प्रोत्साहन दिले जाते. इथे लागू असलेल्या सक्तीमुळे येथे हिंदू धर्माची लोकसंख्या नाही. सोमालियामध्ये मुस्लिम लोकसंख्या आहे. सोमालिया खूपच अस्थिर देश आहे. येथे हिंदू लोकसंख्याच नाही. येमेनमध्ये मुस्लिम लोकसंख्या राहते. येथे कोणत्याही प्रकारची विविधता नाही. त्यामुळे येथे हिंदू लोकसंख्या वसलेली नाही. तूवालू , नौरू,पलाऊ, मार्शल द्वीप आणि किरिबिती या बेटांवर केवळ ख्रिश्चनधर्मीय वास्तव्य करतात.